लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत
By admin | Published: December 5, 2015 06:44 PM2015-12-05T18:44:41+5:302015-12-05T18:47:17+5:30
'लष्कर-ए-तोयबा'चे तीन दहशतवादी राजधानी दिल्लीत लपले असून ते आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'चे तीन दहशतवादी राजधानी दिल्लीत लपले असून ते आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अशी खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. यानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोलिसांनी एफआयआर दाखल करत शोधमोहिम हाती घेतली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधून लष्करचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसून दिल्लीत आले असून दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि हाय प्रोफाईल व्यक्ती त्यांच्या निशाण्यावर असल्याचे समजत आहे. ओळख लपविण्यासाठी त्यांनी खोटी नावे धारण केली आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या लोधी कॉलनी परिसरात १ डिसेंबर रोजी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात अनेक देश दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत असून आता भारतावरही हल्ल्याचे सावट आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या आणखी एका गुप्तहेराला अटक
दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'साठी हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. साबिर असे त्याचे नाव असून तो शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे.