नव्या रूपातील थ्री टियर एसी रेल्वे डबे सफरीसाठी सज्ज

By admin | Published: November 3, 2016 06:37 AM2016-11-03T06:37:32+5:302016-11-03T06:37:32+5:30

नव्या आरामदायी ‘हमसफर’ रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे नव्या आखणीचे व पूर्णपणे नव्या रंग-रूपातील थ्री टियर एसी वर्गाचे डबे सफरीसाठी सज्ज झाले आहेत.

Three-tier AC train coaches in new format are ready for travel | नव्या रूपातील थ्री टियर एसी रेल्वे डबे सफरीसाठी सज्ज

नव्या रूपातील थ्री टियर एसी रेल्वे डबे सफरीसाठी सज्ज

Next


नवी दिल्ली : रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नव्या आरामदायी ‘हमसफर’ रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे नव्या आखणीचे व पूर्णपणे नव्या रंग-रूपातील थ्री टियर एसी वर्गाचे डबे सफरीसाठी सज्ज झाले आहेत. या महिन्याच्या मध्यात दिल्ली-गोरखपूर मार्गावर पहिली ‘हमसफर’ गाडी धावू लागेल.
एसी थ्री टियर हा रेल्वे प्रवाशांचा सर्वात लोकप्रिय वर्ग मानला जातो. म्हणूनच नव्या ‘हमसफर’ गाडीला सर्व डबे याच वर्गाचे जोडण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रेल कोच फॅक्टरीने चार गाड्यांसाठी पुरतील, एवढे डबे तूर्तास तयार केले आहेत. पाचव्या गाडीचे डबे तयार करण्याचे काम सुरू आहे.
नव्या रंग-रूपातील असा हा एसी थ्री टियरचा एक डबा सध्या नमुन्यादाखल दिल्लीतील सफदरजंग रल्वे स्थानकात प्रवाशांना पाहण्यासाठी व त्यांची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी आणून उभा करून ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गाडीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून त्या इतर मार्गांवर सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याआधी लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना थ्री टियर एसी डब्यांचे रूपडे बदलले गेले होते. लालूंनी ‘गरीब रथ एक्स्प्रेस’ नावाची आम जनतेसाठी नवी गाडी सुरू केली आणि त्यात ‘एसी थ्री इकॉनॉमी’ असा पूर्णपणे नवा वर्ग सुरू करण्यात आला. त्यासाठी प्रचलित ‘एसी थ्री टियर’ डब्यांमध्ये फेरबदल केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून त्या डब्यांमध्ये साईड अपर आणि साईड लोअर बर्थच्या मध्ये ‘साईड मिडल’ असा तिसरा बर्थ मध्ये घुसडण्यात आला. परंतु ती रचना अडचणीची असल्याने प्रवाशांमध्ये अप्रिय ठरली व अखेरीस तसे डबे बंद करावे लागले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डब्याची अंतर्गत रंगसजावट आकर्षक व नेत्रसुखद असेल.
त्यात ये-जा करण्याच्या मार्गिकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
प्रत्येक डब्यात चहा-कॉफी देणारी यंत्रे असतील.
प्रत्येक दरवाजाच्या वर जीपीएस आधारित अशी प्रवाशांना उपयुक्त माहिती प्रदर्शित केली जाईल.
डब्यात ठिकठिकाणी आग आणि धूरशोधक यंत्रे असतील.
साईड बर्थना व मार्गिकांमध्ये पडदे असतील.
ठिकठिकाणी स्वचलित रूम फ्रेशनर असतील.
सध्या बर्थ क्रमांक व त्यांचा अपर, मिडल व लोअर हा क्रम लोखंडी पट्टीवर स्टेन्सिलने लिहिलेला असतो. त्याऐवजी विमानात असतात तसे स्वप्रकाशित नंबर लावलेले असतील.
टॉयलेटच्या भिंती खरवडल्या जाऊ नयेत अथवा त्यावर कोणताही चित्रकारी करता येऊ नये यासाठी त्यांना जेल कोटिंग केलेले असेल.

Web Title: Three-tier AC train coaches in new format are ready for travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.