बनावट दाखल्यांचा गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान तिघे फरारच : महाभागांनी संगनमताने केला प्रकार, रॅकेट असण्याची शक्यता

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:30+5:302016-03-15T00:34:30+5:30

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.

Three types of conflicts in front of police | बनावट दाखल्यांचा गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान तिघे फरारच : महाभागांनी संगनमताने केला प्रकार, रॅकेट असण्याची शक्यता

बनावट दाखल्यांचा गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान तिघे फरारच : महाभागांनी संगनमताने केला प्रकार, रॅकेट असण्याची शक्यता

Next
गाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.
पाचोरा येथील अहमद मुसाजी बोहरी (वय ५५) याचा मुलगा अझिज याला पासपोर्ट बनवण्यासाठी नावाचा दाखला हवा होता. त्यासाठी अहमदने त्याच्या नावाचा बनावट दाखला तयार केला. त्यावर जळगाव महापालिकेचा शिक्का मारून इतर बनावट दस्तावेज जोडून ते दुरुस्तीसाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जमा केले. हा प्रकार जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी ही बाब वरिष्ठ निबंधकांच्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार गंभीर असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा
प्राथमिक तपासात हा प्रकार संगनमताने झाल्याने उघड झाल्याने अहमद मुसाजी बोहरी (५५, रा.पाचोरा), पवन विलास मोराणकर (२५, रा.पाचोरा), संजय विक्रम पाटील (५१, रा.जळगाव), सोमनाथ नारायण वाणी (३५, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) व महापालिकेचा लिपिक संदीप मिलिंद तायडे (३६, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सुरुवातीला संदीप तायडेला ४ मार्चला रात्री ९.५२ वाजता तर सोमनाथ वाणी याला ८ मार्चला रात्री १० वाजता पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासकामात अडथळे
गुन्हा दाखल झाल्यावर तपास कामादरम्यान, ६ व ७ मार्चला शासकीय सुटी आल्याने आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करता आले नाहीत. नंतर संदीपची प्रकृती बिघडल्याने त्याला विचारपूस करता आली नाही. तो पोलीस कोठडीत असताना शहर पोलीस ठाण्यात दुसरा गंभीर गुन्हा दाखल झाला. त्याचाही तपास या प्रकरणातील तपासाधिकार्‍यांकडे आल्याने एकाच वेळी दोन्ही गुन्‘ांचा तपास करता येणे शक्य नव्हते. म्हणून या प्रकरणाचा तपास मंदावला होता.

Web Title: Three types of conflicts in front of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.