धावत्या रिक्षातून वृध्द महिलेचे दागिने लांबविणार्या तिघांना अटक पाळत ठेवून केली कारवाई : फिर्यादी महिलेने ओळखले तिघांना
By admin | Published: May 18, 2016 12:44 AM2016-05-18T00:44:57+5:302016-05-18T00:44:57+5:30
जळगाव : चालत्या रिक्षात गळा दाबून वृध्द महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवणार्या तिघांना मंगळवारी शहर पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. दरम्यान, फिर्यादी महिलेने तिघांना ओळखल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.धीरज महारु राठोड (वय ४२ मूळ रा.आंबेवडगाव ह.मु.नशिराबाद), शेख जाकीर शेख रहिम उल्ला (वय ३८ रा.नशिराबाद) व आसाराम दोधाराम राठोड (मुळ रा.बर्हाणपुर ह.मु.नशिराबाद) अशी तिघांची नावे आहेत.
Next
ज गाव : चालत्या रिक्षात गळा दाबून वृध्द महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवणार्या तिघांना मंगळवारी शहर पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. दरम्यान, फिर्यादी महिलेने तिघांना ओळखल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.धीरज महारु राठोड (वय ४२ मूळ रा.आंबेवडगाव ह.मु.नशिराबाद), शेख जाकीर शेख रहिम उल्ला (वय ३८ रा.नशिराबाद) व आसाराम दोधाराम राठोड (मुळ रा.बर्हाणपुर ह.मु.नशिराबाद) अशी तिघांची नावे आहेत. नूरजहाबी अब्दुल वाहब शेख (वय ६५ रा.गेंदालाल मील, जळगाव) सात मे रोजी पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त व लघवीची तपासणीसाठी आल्या होत्या. ते काम आटोपून रिक्षाने घरी जात असताना सकाळी अकरा ते साडे अकरा या कालावधीत कोर्ट परिसर ते ख्वॉजामियॉ चौकात दरम्यान तिघांनी त्यांचा गळा दाबून दागिना लांबविले होते. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोर्ट परिसरात ठेवली पाळतया गुन्ाच्या तपासात सर्व संशयितांची माहिती काढल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील व प्रीतम पाटील यांनी कोर्ट परिसरात पाळत ठेवली. तिघेजण रिक्षात बसलेले होते. रस्त्याने जाणार्या महिलांनाच फक्त ते रिक्षात बसण्यास सांगत होते. दोघं कर्मचार्यांनी त्यांचा पाठलाग केला. आकाशवाणी चौकातून ते पुन्हा कोर्ट परिसरात आले. या दरम्यान त्यांनी एकही पुरुषाला बसविले नाही. यातील धीरज व जाकीर हे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याने तिघांना संशयित म्हणून दुपारी ताब्यात घेण्यात आले.नंतर सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय शेलार, अमोल विसुपते व संजय भालेराव यांनीही त्यांची कुंडली काढली.फिर्यादी महिलेच्या घरी नेले फोटोफिर्यादी महिलेचे वय व प्रकृती पाहता सहायक निरीक्षक सारिका कोडापे व प्रीतम पाटील यांनी तिघांचे फोटो काढून हे तेच आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्यांचे घर गाठले. तेथे या तिघांना त्यांनी ओळखल्याने त्यांना रात्री अधिकृतपणे अटक करण्यात आली. यातील त्या दिवशी रिक्षा चालवणारा फरार आहे. दागिन्यांबाबत अजून त्यांच्याकडून ठोस माहिती मिळू शकली नाही.