साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांधतर्फे तीन लकडी शाळेत साहित्यवाटप
By admin | Published: July 6, 2016 10:20 PM2016-07-06T22:20:52+5:302016-07-07T00:53:00+5:30
इगतपुरी : साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध यांच्यातर्फे तीन लकडी शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
इगतपुरी : साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध यांच्यातर्फे तीन लकडी शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी गरज ओळखून शिक्षण घेणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी मुलांची शिक्षणाची आवड पाहून बालवयातच आवडत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती अलका जाधव यांनी केले.
साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणे यांच्यातर्फे तीन लकडी जि.प. शाळेत मार्गदर्शन शिबिर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे, मुख्याध्यापक वासुदेव वराडे, हेमलता चव्हाण, सविता गोसावी, उमेश बैरागी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुलांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्र म, शाळेची गुणवत्ता, सादर केलेला परिपाठ, बोलक्या भिंती पाहून उपस्थितांनी कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे यांनी मुलांनी अभ्यास कसा करावा याचे विविध तंत्र सांगितले. यावेळी साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणेतर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य, विविध गोष्टींचे पुस्तके देण्यात आल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. सूत्रसंचलन उमेश बैरागी यांनी केले.
छायाचित्र----साद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणे यांच्यातर्फे तीन लकडी जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन शिबिरप्रसंगी उपस्थित बांधकाम सभापती अलका जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे, मुख्याध्यापक वासुदेव वराडे, उमेश बैरागी, हेमलता चव्हाण, सविता गोसावी.