तीन वर्षांच्या मुलीचे अवयवदान

By admin | Published: August 2, 2015 10:41 PM2015-08-02T22:41:32+5:302015-08-02T22:41:32+5:30

केरळमधील ब्रेनडेड घोषित केलेल्या तीन वर्षांच्या मुलीचे अवयवदान करण्यात आले असून, ती देशातील सर्वांत लहान वयाची डोनर ठरली आहे.

Three year old girl's organism | तीन वर्षांच्या मुलीचे अवयवदान

तीन वर्षांच्या मुलीचे अवयवदान

Next

तिरुवअनंतपूरम : केरळमधील ब्रेनडेड घोषित केलेल्या तीन वर्षांच्या मुलीचे अवयवदान करण्यात आले असून, ती देशातील सर्वांत लहान वयाची डोनर ठरली आहे. तिचे यकृत, मूत्रपिंड व कॉर्निआ हे अवयव डॉक्टरांनी काढले.
तीन वर्षांची ही मुलगी शुक्रवारी घरासमोर खेळत असताना बेशुद्ध पडली व तिला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले; पण तिची स्थिती बिघडतच गेली व शनिवारी डॉक्टरांनी तिचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर डॉक्टरांनी रविवारी (आज) सकाळी तिचे यकृत, मूत्रपिंड व डोळ्यातील कॉर्निआ काढले. तिचे यकृत व मूत्रपिंड पाच वर्षांच्या मुलाला बसविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Three year old girl's organism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.