तीन वर्षांपूर्वीच ईव्हीएममध्ये गडबड
By admin | Published: April 15, 2017 01:15 AM2017-04-15T01:15:53+5:302017-04-15T01:15:53+5:30
भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला
लखनऊ : भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर झाली. निवडणुकीत उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी २५० जागांवर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती म्हणाल्या. इतर जागा आपण तशाही जिंकणारच आहोत, असा विचार भाजपाने तेव्हा केला, असे मायावती शुक्रवारी म्हणाल्या.
ईव्हीएमचा मुद्दा घेऊन बसपने दर महिन्याच्या ११ तारखेला निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. आता ईव्हीएमचा प्रश्न सर्वोच्च
न्यायालयात गेलेला असल्यामुळे ही निदर्शने थांबवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आल्याचा मुद्दा मी उपस्थित केल्यापासून भाजपाने मला लक्ष्य केले आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, ईव्हीएमच्या
मुद्द्यावर मी सुरू केलेल्या संघर्षात इतर पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल मी बोलणे थांबवावे म्हणून मला लक्ष्य करण्यात आले आहे. तो एका कटाचा भाग आहे. परंतु मी लोकशाही वाचवण्यासाठी या संघर्षातून माघार घेण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुजन समाज पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अन्य पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहे
भाजपने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल आमचा पक्ष संघर्ष सुरूच ठेवील. त्यामुळे आता बसप ईव्हीएमविरोधातील लढाई लढण्यासाठी भाजपविरोधी पक्षांची मदत घ्यायलाही तयार आहे कारण आधी लोकशाही असून ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
ईव्हीएममधील छेडछाड लवकर रोखणे हे पक्षाच्या हिताचे
असून त्यासाठी आम्ही विषावरील उतारा विषच वापरायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.