हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे टॉयलेटमध्ये कोंडले

By admin | Published: September 9, 2014 09:01 AM2014-09-09T09:01:20+5:302014-09-09T11:32:42+5:30

बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे टॉयलेटमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

For three years in the toilet, the woman has been convicted in the toilet | हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे टॉयलेटमध्ये कोंडले

हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे टॉयलेटमध्ये कोंडले

Next
>ऑनलाइन लोकमत
दरभंगा, दि. ९ - बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे टॉयलेटमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा येथे हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती व सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडले. मात्र या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तिची सुटका केली, तेव्हा ती जीर्ण, फाटके कपडे, अस्ताव्यस्त केस, वाढलेली नखे अशा अवतारात होती. इतका काळ छोट्‌याशा जागेत, अंधुकशा प्रकाशात राहिल्यामुळे बाहेर आल्यावर तिला धड डोळेही उघडता येत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. 
पीडित महिलेच्या जबाबानुसार दरभंगा येथील रामबाग परिसरात राहणा-या या पीडित महिलेचे चार वर्षांपूर्वी (२०१०)  प्रभात कुमार सिंग याच्याशी लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर थोड्याच दिवसांनी तिचा पती व  सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. पण त्यानंतरही हुंडा  न मिळाल्याने त्यांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरूवात केली आणि तिने एका मुलीला जन्म दिल्यावर तिची अवस्था आणखीनच बिकट झाली. तिला कधीही तिचे आई- वडील किंवा इतर नातेवाईकांना भेटू दिले जात नसे, तसेच कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी बोलण्याचीही तिला परवानगी नव्हती. तिला एका टॉयलेटमध्ये कैद करण्यात आले, जिथे पुरेसा प्रकाशही नव्हता. सासरचे लोक तिला उरलंसुरलं अन्न खायला घालत, तिच्या ३ वर्षांच्या मुलीलाही तिच्यापासून दूर ठेवले जात असे. 
पीडित महिलेच्या वडीलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी त्या महिलेची इतक्या वर्षांच्या जाचातून सुटका झाली. 
पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती व सासू-सास-यांवर गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
 

Web Title: For three years in the toilet, the woman has been convicted in the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.