मुंबईच्या या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा

By admin | Published: March 16, 2016 01:50 PM2016-03-16T13:50:54+5:302016-03-16T13:51:47+5:30

ओमकार दिवेकर, रजत भार्गव आणि समर्थ महाजन या तीन तरुणांनी ठरवलं की देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या नजरेतून भारत बघायचा

The three youths of Mumbai are in the Indian parikrama | मुंबईच्या या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा

मुंबईच्या या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा

Next
योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - ओमकार दिवेकर, रजत भार्गव आणि समर्थ महाजन या तीन तरुणांनी ठरवलं की देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या नजरेतून भारत बघायचा आणि त्यांनी 9 मार्चला 16 दिवसांचा प्रवास सुरू केला. मुंबईहून सौराष्ट्रला प्रयाण केल्यानंतर खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे भारताला ते प्रदक्षिणा घालत आहेत. 
या सगळ्या प्रवासाचं लाइव्ह प्रक्षेपण ओमकार टि्वटरवर करत आहे. या पोस्टमधले सगळे फोटो त्याच्याच टि्वटर हँडलवरून घेतलेले आहेत.
राजस्थान, पंजाब, काश्मिर असं रेल्वेने फिरत फिरत चाललेल्या या मस्त कलंदरांनी त्यांना भेटत असलेले स्थानिक, त्यांचे विचार हेदेखील शेअर केले आहेत.
 
 
मुंबईतल्या कॅमेरा या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तिघे काम करतात. मुंबईहून सुरू झालेला ट्रेन प्रवास ओखा, दिल्ली, कटरा, बनिहाल, बारामुल्ला, दिब्रुगढ, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम आणि मुंबईला परत असा 16 दिवसांचा आहे.
 
 
हा सगळा प्रवास ते जनरल कंपार्टमेंटमधून करत असून एक अत्यंत वेगळा अनुभव घ्यावा आणि देशभरातल्या सर्वसामान्यांशी संवाद साधावा यासाठी हा उपक्रम केल्याचे ओमकारने सांगितलं.
 
 
Omkar Divekar / Via Twitter: @MishterApu

Web Title: The three youths of Mumbai are in the Indian parikrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.