आयुर्वेदाद्वारे जागतिकस्तरावर आरोग्य टिकविणे शक्य
By admin | Published: January 16, 2017 12:44 AM2017-01-16T00:44:57+5:302017-01-16T00:48:10+5:30
पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीयांना लाभलेली आयुर्वेद प्रणाली सुदृढ राहण्याकरिता परिपूर्ण आहे.
नाशिक : नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाड्यात असलेल्या महाराष्ट्र बॅँक ग्रामीण शाखेच्या बाहेर पैसे काढण्याची स्लीप विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सदर प्रकार आजूबाजूच्या काही अज्ञात विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सुभाष परब यांनी दिली आहे.
ठाणापाडा येथील सदर बॅँकेच्या शाखेच्या परिसरात पैसे काढण्याची स्लीप वीस रुपये दराने विकली जात होती व सदर स्लीपमध्ये आवश्यक माहिती भरून घेण्यासाठी संबंधितांकडून दहा रुपये घेतले जात होते. सदर प्रकाराला बॅँक व्यवस्थापनाने दुजोरा देत मंगळवारी (दि.३) घडलेल्या घटनेच्या तपासासाठी सुरक्षा तथा माहिती व तंत्रज्ञान अधिकार्यांनी ठाणापाडा शाखेला भेट दिली. यावेळी संपूर्ण पाडा त्यांनी पिंजून काढत आदिवासी बांधवांसोबत संवादही साधला. तसेच सदर प्रकार सध्या छुप्या पद्धतीने सुरू आहे का हेदेखील तपासून बघितले; मात्र सध्या असा कुठलाही प्रकार सुरू नसून एजंटांचा गोरखधंदाही नसल्याचे त्यांना आढळून आले आहे. स्थानिक आदिवासी रहिवाशांनीदेखील अशा प्रकारची कुठलीही तक्रार बोलून दाखविली नाही. नोव्हेंबर महिन्यात घडल्या प्रकारामागे काही अज्ञात विद्यार्थी होते व त्यावेळीदेखील बॅँक कर्मचार्यांपैकी कोणाचाही त्यामध्ये सहभाग किंवा अज्ञात विद्यार्थ्यांना छुपी मदतही केली नसल्याचा दावा परब यांनी केला आहे. आदिवासींनी सदर शाखेतून सुरळीतपणे बॅँकिंगसेवा पुरविली जात असून, कर्मचार्यांनाही त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाखेत येणार्या ग्राहकांचा कल बघून तेथे पैसे काढण्याच्या व भरण्याच्या पावत्या उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेवारसपणे अतिरिक्त पावत्या उपलब्ध करून देऊ नये, असे बजावण्यात आले आहे.
इन्फो...
गोरखधंद्याचे पुरावे नाही
बॅँक कर्मचार्यांच्या पाठिंब्याने काही एजंटांमार्फत स्लीपची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा संशय घेतला जात होता; मात्र मंगळवारी अधिकार्यांनी केलेल्या तपासात असे कुठलेही पुरावे त्यांना ठाणापाडा शाखा किंवा परिसरात आढळून आले नसल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सुभाष परब यांनी दिली आहे. यापुढे अशा कुठल्याही प्रकाराला किंवा भूलथापांना आदिवासींनी बळी पडू नये, यासाठी बॅँकेच्या कर्मचार्यांना त्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.