फेकावे लागणार मोबाइल, लॅपटॉप, फ्रीज; १३४ इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ‘एक्स्पायरी’ निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:57 AM2023-09-09T07:57:30+5:302023-09-09T07:57:47+5:30

वेस्टविरोधात सरकारच्या उपाययोजना

Throw away mobile, laptop, fridge; 134 'Expiry Date' of electronic devices fixed | फेकावे लागणार मोबाइल, लॅपटॉप, फ्रीज; १३४ इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ‘एक्स्पायरी’ निश्चित

फेकावे लागणार मोबाइल, लॅपटॉप, फ्रीज; १३४ इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ‘एक्स्पायरी’ निश्चित

googlenewsNext

नवी दिल्ली : कार तसेच अन्य चारचाकी वाहने १५ वर्षांनंतर भंगारात जमा करावी लागतात; याप्रमाणे नागरिकांच्या रोजच्या वापरात असलेली वॉशिंग मशिन, फ्रिज, लॅपटॉप तसेच मोबाइल, आदी वस्तूंसाठी केंद्र सरकारकडून एक्स्पायरी निश्चित केली आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने १३४ इलेक्ट्रिक उपकरणांची एक्पायरीची मुदत निश्चित केली आहे. ही मुदत संपल्यानंतर या वस्तूंना इ-वेस्ट ठरवून नष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहे आहेत. हा अवधी संपल्यानंतर ग्राहकांना वस्तू जमा करून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

कॉम्प्युटर, मॉनिटर, माउस, की-बोर्ड, लॅपटॉप, कंडेन्सर, मायक्रो चिप, टेलेव्हिजन, वॉशिंग मशिन, आदी इ-वेस्टची विल्हेवाट लावणे वा प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प मध्य प्रदेशात भोपाळ येथे उभारला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड व भोपाळ स्थानिक प्रशासन यांच्याकडून हा प्रकल्प चालवला जातो.  (वृत्तसंस्था)

कायदा काय सांगतो? 
सरकारने देशातील इ-वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी १ एप्रिल २०२३ रोजी कायदा संमत केला. यानुसार जो ई-वेस्टची निर्मिती करील, त्यालाच त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. कंपनीने तयार केलेल्या वॉशिंग मशिनसाठी १० वर्षांची मुदत असेल. वॉशिंग मशिनच्या आणखी उत्पादनांची किंवा नवीन ब्रँड लॉँच करण्याची परवानगी मागताना कंपनीला १० वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या ६० टक्के वॉशिंग मशिन नष्ट केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

विल्हेवाट लावण्याची जबाबदारी निर्मात्या कंपन्यांवरच 

विशेष बाब अशी की, मुदत संपलेल्या वस्तूंची विल्हेवाट करण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित केली आहे. योग्य प्रकारे यांची विल्हेवाट लावल्यानंतरच कंपन्यांना जुनी वस्तू बदलणे किंवा नवीन ब्रँड लाँच करता येणार आहे. आता कंपन्या अशा वस्तूंची निर्मिती करणार की, ज्यांचे एकूण आयुष्य फार मोठे नसेल. फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिन, आदींमध्ये अशा दर्जाचे सामान वापरले जाईल, जे मुदत संपल्यानंतर वापरण्याजोगे उरणार नाही. यामुळे ग्राहकांना नाइलाजाने या वस्तू भंगारात काढाव्या लागतील. 

खासगी वाहनांसाठी काय आहेत नियम ? 
खासगी वाहनांसाठी ही मुदत १५ वर्षांची आहे. यानंतर कारची फिटनेस टेस्ट करावी लागते. ती पास झाली तर नोंदणी आणखी पाच वर्षांसाठी वाढविली जाते. नापास झाल्यास ती भंगारात पाठवावी लागते.

काय किती वर्षांनी जाणार भंगारात? 
फ्रिज    १० वर्षे 
सीलिंग फॅन    १० वर्षे 
वॉशिंग मशीन    १० वर्षे 
रेडिओ सेट    ८ वर्षे
स्मार्टफोन/लॅपटॉप    ५ वर्षे
टॅबलेट/आयपॅड    ५ वर्षे
स्कॅनर    ५ वर्षे

Web Title: Throw away mobile, laptop, fridge; 134 'Expiry Date' of electronic devices fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.