देव-दानव युद्धाचा थरार

By Admin | Published: December 14, 2015 12:17 AM2015-12-14T00:17:44+5:302015-12-14T00:17:44+5:30

कोयाळी भानोबा उत्सव : राज्यातून भाविक

Thunder of God-demon war | देव-दानव युद्धाचा थरार

देव-दानव युद्धाचा थरार

googlenewsNext
याळी भानोबा उत्सव : राज्यातून भाविक
शेलपिंपळगाव :
ऐशी भानोबाची ख्याती !
प्रतिवर्षी येती उत्सवासी !!
भक्तिभावे पुजता त्यासी !
दु:ख दैन्य निवारी !!
असाच प्रत्यय श्री क्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविक-भक्तांनी अनुभवला. श्री भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय आयोजित उत्सवामध्ये पहिल्या व दुसर्‍या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक-भक्तांनी येथे हजेरी लावली होती.
कोयाळीत श्री भानोबा देवाच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. या वेळी देवाच्या स्वागत समारंभाला नागरिकांची संख्या मोठी लक्षणीय होती. कोयाळी येथे शनिवारी आणि रविवारी देव-दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी, तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली. तत्पूर्वी, आज पहाटे श्री भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले. देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली. उत्सवात कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. या वेळी जिल्‘ातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्यक्रमाची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.
सोमवारी (दि. १४) सकाळी ६ ते ७ श्री भानोबा देवाचा ओलांडा, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ श्री भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल, तसेच कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. भानोबाच्या तीन दिवसीय उत्सवात खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिलीप मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड आदींसह विविध राजकीय पक्षाच्या मुख्य पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. तीन दिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी- भानोबाच्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, सरपंच वृंदाताई गायकवाड आदींसह सर्व ग्रामस्थ व देवस्थानचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट :- कोयाळी-भानोबाची येथील हा देव-दानवांचा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. राज्यातून या उत्सवाला दोन दिवस भाविक हजेरी लावतात. परंतु, या वर्षी हा उत्सव अनुभवण्यासाठी परदेशी पाहुण्यांनीही विशेष हजेरी लावली होती.
फोटो ओळ :- श्री भानोबादेवाच्या नावानं चांगभलं... श्री क्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव-दानवांच्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. इन्सेंटमध्ये श्री भानोबा देवाचे लोभस रूप. (छायाचित्र :- भानुदास पर्‍हाड)

Web Title: Thunder of God-demon war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.