पोलीस स्टेशनमध्ये तुंबळ हाणामारी
By admin | Published: May 8, 2016 11:08 PM2016-05-08T23:08:09+5:302016-05-08T23:08:09+5:30
जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होते. ही घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन महिला कर्मचारी हजर होत्या, त्यामुळे त्याही हा प्रकार पाहून घाबरल्या. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होते. ही घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन महिला कर्मचारी हजर होत्या, त्यामुळे त्याही हा प्रकार पाहून घाबरल्या. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंबेडकर नगरातील बलभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष शालीक सोनवणे यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे त्या मंडळाचे अध्यक्षपद आपल्या गटाकडे यावे यावरुन दोन गटात वाद आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी मिरवणुकीच्या कारणावरुनही दोन गटात वाद झाला होता. आताही ते कारण पुढे करण्यात आले. या वादामुळे आंबेडकर नगर व पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.दारुचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा रागशनिवारी शनी पेठ पोलिसांनी या भागात कोम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते, तेव्हा काही दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. एकमेकाच्या सांगण्यावरुनच ही कारवाई झाल्याचा संशय व्यक्त करत काही जणांनी गोंधळ घातला.यांच्यावर दाखल झाले गुन्हेमनपा कर्मचारी सुरेश पोपट पवार (वय ४५ रा. वाघनगर)याच्या फिर्यादीवरुन सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सोनवणे, गणेश राजेश सोनवणे, प्रशांत सुरेश बाविस्कर, प्रकाश मिलिंद गायकवाड, शोभा मधुकर सावळे, रेखा विजय जाधव, लक्ष्मी सचिन सावळे, आशा राजेश सोनवणे व पद्माबाई मिलिंद गायकवाड (सर्व रा.आंबेडकर नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश मिलिंद गायकवाड (वय ३५ रा.आंबेडकर नगर) याच्या फिर्यादीवरुन गोविंद पंडित सोनवणे, सुरेश पोपट पवार, दीपक पोपट पवार, भारत पंडित सोनवणे, पंकज चंद्रकांत सोनवणे, राहूल कांतिलाल सोनवणे, भिमा गौतम तायडे, गोरख चंद्रमणी तायडे, बंटी चंद्रकांत सोनवणे, विशाल निवृत्ती सोनवणे, पंकज निवृत्ती सोनवणे, चंद्रमणी भिकारी तायडे, वर्षा रोहीदास सावळे, वंदना गोविंद सोनवणे, संगिता भारत सोनवणे,उज्ज्वला दीपक बाविस्कर,गौतम भिकारी तायडे, विशाल कैलास सोनवणे व कैलास सोनवणे (सर्व रा.आंबेडकर नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.