रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग
By admin | Published: July 12, 2017 11:13 AM2017-07-12T11:13:28+5:302017-07-12T11:43:40+5:30
प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12- ज्या प्रवाशांना विमानाचं तिकीट बुकिंग करायचं आहे अशा प्रवाशांसाठी एक सोपा पर्याय रेल्वेकडून मिळणार आहे. प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे. रेल्वेकडून या आठवड्यात नवं मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या अॅपमुळे प्रवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ घेता येइल. स्टेशनवरील हमालांची माहिती मिळवणं तसंच सेवा उपलब्ध करून घेणं, विश्रातीसाठी रूम बुकिंग तसंच खाद्यपदार्थ ऑर्डर करणं, या सर्व गोष्टी एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आता करता येणार आहेत. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
रेल्वेच्या सगळ्या सुविधा एका क्लिकवर मिळवून देणारं हे अॅप ‘क्रिस’ (सेन्ट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम) या रेल्वेच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारी असलेल्या कंपनीने केली आहे. यासाठी सात कोटींचा खर्च झाल्याची माहिती या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा
रेल्वेच्या २०१६-१७ च्या बजेटमध्ये या अॅप संदर्भातील घोषणा करण्यात आली होती. ‘सध्या रेल्वेचं तिकिट बुकिंग, तक्रार निवारण तसंच सुविधांसाठी विविध अॅप उपलब्ध आहेत. अनेक अॅप्सचा गोंधळ मिटविण्यासाठी तिकीट बुकिंग आणि रेल्वेबद्दलच्या तक्रारी यांच्यासाठी दोन अॅप गरजेच आहे, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटदरम्यानच्या त्यांच्या भाषणात म्हंटलं होतं.
‘सध्या रेल्वेच्या वेगवेगळया सेवांसाठी वेगवेगळे अॅप आहेत. विविध अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या विशिष्ट सेवा दिल्या जातात. रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी मिळायला हव्या, यासाठी रेल्वेकडून नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुविधांसाठी मोबाईल अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक सेवेसाठी अॅप शोधून ते डाऊनलोड करावं लागत. या सगळ्या अॅपला पर्याय देण्यासाठी नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
‘रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सगळ्या सुविधा एकाच अॅपवर मिळणं गरजेचं आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सुविधांसोबतच टॅक्सी बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि विमानाच्या तिकिटाचं बुकिंगही करण्यात येणार आहे,’ असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.