कर्नाटकात तिकीटवाटपात दिला घराणेशाहीलाच कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:45 PM2023-04-25T12:45:20+5:302023-04-25T12:45:41+5:30

काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या पक्षाचे आपल्या कृतीवर मात्र मौन

Ticket distribution in Karnataka is due to the gharanashahi | कर्नाटकात तिकीटवाटपात दिला घराणेशाहीलाच कौल

कर्नाटकात तिकीटवाटपात दिला घराणेशाहीलाच कौल

googlenewsNext

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उमेदवारी देताना भाजपसहित सर्व पक्षांनी घराणेशाही कायम राहील, अशी तजवीज केली आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या भाजपने कर्नाटकमधील आपल्या नेत्यांच्या नातेवाइकांना दिलेल्या उमेदवारीबद्दल मात्र सोयीस्कर मौन बाळगले आहे. भाजप उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास तिथेही घराणेशाहीला झुकते माप दिल्याचे स्पष्ट दिसून येते. 

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट. विजयेंद्र यांचे थोरले बंधू लोकसभेचे खासदार आहेत. 

मंत्र्यांच्या नातेवाइकांना दिले तिकीट
वाहतूकमंत्री बी. श्रीरामुलू व त्यांचे पुतणे टी. एच. सुरेश बाबू यांना निवडणुकांत उमेदवारी दिली. पर्यटनमंत्री आनंदसिंह यांच्याऐवजी त्यांचा पुत्र सिद्धार्थसिंह यांना विजयनगर येथून तिकीट दिले. काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांनी बलाढ्य नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्यात हात आखडता घेतला नव्हता.

आणखी कोण कोण?
n खाणमालक व वादग्रस्त नेते गोली जनार्दन रेड्डी यांचे दोन बंधू सोमशेखर रेड्डी व करुणाकर रेड्डी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 
n रमेश जारकीहोली व बालचंद्र जारकीहोली या बंधूंना तर दिवंगत नेते उमेश कट्टींचे पुत्र निखिल कट्टी व त्यांचे काका रमेश कट्टी यांना रिंगणात उतरविले.
n भाजपचे विद्यमान आमदार अरविंद लिंबावली यांची पत्नी मंजुळा अरविंद, मंत्री शशिकला जोल्ले यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना तिकीट दिले आहे. 
n चिंचोलीतील उमेदवार अविनाश जाधव खासदार उमेश जाधव यांचे पुत्र, तर चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे माजी सदस्य बी. जी. पाटील यांचे पुत्र आहेत.

माजी मुख्ममंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र व विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. 

लोकसभा खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे नातेवाईक रवी सुब्रमण्य यांना तिकीट मिळाले आहे. 

खासदार कराडी सगण्णा यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांची सून मंजुळा अमरेश यांना विधानसभेची उमेदवारी दिली. 

Web Title: Ticket distribution in Karnataka is due to the gharanashahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.