निवडणुका जिंकण्यासाठी आधीचे सरकार पाडायचे तिजोरीला भगदाड - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 08:46 PM2017-09-22T20:46:56+5:302017-09-22T21:56:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणीसी दौऱ्यावर आहेत. आपल्या मतदार संघामध्ये त्यांनी तेथील आधीच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी वाराणसीसाठी 1000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे.
काशी, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. आपल्या मतदार संघामध्ये त्यांनी तेथील आधीच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी वाराणसीसाठी 1000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, निवडणुकीसाठी राज्यातील यापूर्वीच सरकार तिजोरीत पैशांचा वापर करत होतं. त्यामुळे राज्यातील काम कुर्मगती होत होती. ते म्हणाले की. आमच्या सरकारचा असा प्रयत्न आहे की, गरीबांच्या जीवनामध्ये बदल करायचा. त्यासाठी योग्य त्या योजना आखल्या गेल्या आहेत.
लोकार्पण आणि शिलान्यास कार्यक्रमानंतर पंतप्रधान म्हणाले की, भाजपा सरकार विकासावर भर देत आहे. प्रत्येक गोष्टीच समाधान हे विकास आहे. या आधी सतेत असणाऱ्या सरकारला विकासाबाबत द्वेष होता. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा वापरला जात होता. प्रत्येक गरीब माणूस जे स्वप्न पाहतो ते पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुम्ही कोणत्याही गरीब माणसाला विचारा की जसे आयुष्य तू जगलास तसे तुझी मुले जगली तर चालेल का? त्याचे उत्तर नाहीच असेल. आमचा प्रयत्न हाच आहे की देशातील तळागाळातल्या घटकांपासून सगळ्याच घटकांचा विकास व्हावा. 20 ते 25 वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील एका कार्यक्रमात 1000 कोटींच्या कामचे लोकार्पण आणि शिलान्यास केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी योगी सरकारचे अभिनंदन केलं. ते म्हणाले की, उत्तर भारताच्या विकासात उत्तर प्रदेशच खूप मोठ योगदान आहे. वस्त्र मंत्रालयाद्वारे आज 300 कोटी रुपयांच्या योजनाचं लोकार्पण झालं. मला वाटत नाही यापूर्वी वाराणसीच्या जमीनीवर एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन झालं असेल. असे पंतप्रधान म्हणाले.