मलेशियात पंतप्रधान मोदींसमोर तिरंग्याचा अपमान
By admin | Published: November 21, 2015 12:04 PM2015-11-21T12:04:52+5:302015-11-21T13:46:05+5:30
दक्षिण -पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेस उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतच भारतीय तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २१ - दक्षिण -पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेस उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतच भारतीय तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा फोटो प्रसिद्ध झाला असून नवा वाद निर्माण झाला आहे.
शनिवारी आशियाई शिखर परिषदेपूर्वी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांची भेट घेतली. ते दोघे औपचारिक हस्तांदोलन करत असताना मागच्या बाजूला असलेल्या स्टॅंडवर भारताचा राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचे फोटोत दिसत असून त्यामुळे तिरंग्याचा अपमान झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.