तिहार तुरुंगाचे जेलर दीपक शर्मा यांची फसणवूक, महिलेने लावला 50 लाखांना चूना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 02:32 PM2023-08-29T14:32:37+5:302023-08-29T14:33:53+5:30
बॉडीबिल्डिंग फेम आणि तिहार जेलचे असिस्टंट सुपरिटेंडेंट दीपक शर्मा यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
Online Fraud: ऑनलाइन फसवणूक किंवा हनी ट्रॅपच्या घटना अनेकदा घडतात. तुम्हीही अशा घटनांबद्दल ऐकले किंवा वाचले असेल. हे गुन्हेगार कोणालाही आपला बळी बनवतात. मात्र यावेळी फसवणुकीच्या एका प्रकरणाने सर्वांनाच चकीत केले आहे. यावेळी फसवणुकीचा बळी कोणी सामान्य व्यक्ती किंवा व्यापारी नसून दिल्लीतील तिहार तुरुंगाचे जेलर दीपक शर्मा (Deepak Sharma) आहे. एका महिलेने त्यांची 50 लाखांची फसवणूक केली.
दीपक शर्मा हे केवळ तिहार जेलचे अधिकारी म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते बॉडी बिल्डिंग आणि फिटनेससाठीही ओळखले जातात. दीपक शर्मा यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल नाव गाजवले आहे. मात्र, एका महिलेने त्यांना हेल्थ प्रोडक्ट बिझनेसच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढले आणि आपल्या पतीसोबत मिळून दीपक शर्मा यांची फसवणूक केली.
बॉडीबिल्डिंग फेम आणि तिहार जेलचे असिस्टंट सुपरिटेंडेंट दीपक शर्मा यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, डिस्कव्हरी चॅनलवरील "अल्टीमेट वॉरियर" या रिअॅलिटी शोमध्ये ते सहभागी झाले होते. तिथे त्यांची रौनक गुलिया नावाच्या महिलेशी ओळख झाली. रौनक गुलियाने सांगितले होते की, तिचे पती अंकित गुलिया हे एक प्रसिद्ध हेल्थ प्रोडक्ट उद्योजक आहेत. या दोघांनी दीपक यांना भरघोस नफा कमावण्याच्या बहाण्याने आपल्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास आणि ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले.