TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:46 PM2020-06-01T18:46:32+5:302020-06-01T18:53:32+5:30
शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे.
दौसा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण नानाविध शक्कल लढवत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे.
टिकटॉक व्हिडिओ तयार करत असताना चुकून गळफास लागल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या दौसा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता मुलाला टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचा नाद असल्याची माहिती मिळाली. तसेच तो दररोज वेगवगळे स्टंट करून त्याचे व्हिडीओ तयार करत असे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आयुष विभागाने आणलं 'हे' खास किट; असा होणार फायदाhttps://t.co/iHDDzaWanW#CoronaUpdatesInIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
मुलाचा ज्या रात्री मृत्यू झाला त्या दिवशी तो आपल्या घरातच फाशीचा व्हिडिओ तयार करत होता. व्हिडिओसाठी त्याने घरातील पंख्याला एक कपडा बांधून फाशीचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि व्हिडिओ बनवतानाच तो फास त्याच्या गळ्याभोवती अडकला गेला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा?, डॉक्टरांनी केला अभ्यासhttps://t.co/NixBTUy869#CoronavirusIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
CoronaVirus News : श्रमिक ट्रेन्स मार्ग चुकल्याचा प्रियंका गांधींनी केला होता दावा https://t.co/T0qUjCawx7#CoronavirusIndia#priyankagandhi#IndianRailways#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम