...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:22 PM2020-07-20T16:22:38+5:302020-07-20T16:39:46+5:30
भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे.
नवी दिल्ली : भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे. चिनी अॅप अशी ओळख पुसण्यासाठी टिकटॉकने जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे.
टिकटॉक गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनशी चर्चा करत आहे. चिनी अॅपची ओळख पुसण्यासाठी लंडनमध्ये मुख्यालय उघडून चीन विरोधकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी प्रय़त्न सुरु आहेत. रॉयटर्सला या संबंधी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. चीनपासून दूर राहण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मुख्यालयासाठी कंपनीने अनेक ठिकाणे पाहिली आहेत. त्यापैकी लंडन हे एक आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सुत्राने सांगितले.
टिकटॉक अन्य कोणती शहरे, देशांची चाचपणी करत आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला टिकटॉकने कॅलिफोर्नियाच्या वॉल्ट डिस्नेच्या एका माजी एक्झिक्युटीव्ह, केविन मेयर यांना टिकटॉकच्या मुख्य एक्झिक्युटीव्हपदी नियुक्त केले होते. केविन हे अमेरिकेचेच नागरिक आहेत.
टिकटॉकवर वॉशिंग्टनमध्ये कडक नजर ठेवण्यात येत आहे. या कंपनीची कसून चौकशी केली जात आहे. टिकटॉकवर युजरची माहिती चीनला दिल्याचा संशय आहे. ByteDance कंपनीकडे टिकटॉकचा मालकी हक्क आहे. गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत उद्भवलेल्या समस्या सोडविण्याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. टिकटॉक लंडन आणि चीनच्या बाहेर दुसऱ्या देशांमध्ये पुढील काही वर्षांत ताकद वाढवू शकते, असे या सुत्राने सांगितले.
The Sunday Times नुसार टिकटॉकने ब्रिटनमध्ये ग्लोबल हेडऑफिस खोलण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत चर्चा बंद केली आहे. एका सुत्राने सांगितले की, टिकटॉक आणि ब्रिटन सरकारमध्ये आताही चर्चा सुरु आहे. तर टिकटॉकने यावर कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. पण तरी देखील सायबर क्रिमिनल्स टिकटॉकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंकच्या माध्यमातून युजर्सवर अटॅक केला जात आहे. मालवेअर इंजेक्ट केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट लिंकच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्सना टार्गेट केलं जात आहे. यासोबतच मेसेजवरून ही लोकांना लक्ष्य केलं जात आहे. भारतात सायबर क्रिमिनल्स टिकटॉकवरील बंदीचा फायदा उठवून टिकटॉक व्हिडीओची लिंक पाठवतात आणि निशाणा साधतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती
कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर