उशीर झाल्याने मोदींना विमान हायजॅक झाल्याचं ट्विट
By admin | Published: April 28, 2017 09:52 AM2017-04-28T09:52:35+5:302017-04-28T09:56:41+5:30
विमान प्रवाशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करत मुंबई - दिल्ली विमान हायजॅक झाल्याची भीती व्यक्त केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 28 - विमान प्रवाशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करत मुंबई - दिल्ली विमान हायजॅक झाल्याची भीती व्यक्त केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली. मात्र असं काही झालं नसून फक्त विमान उड्डाणाला उशीर झाल्याने या प्रवाशाने हे ट्विट केल्याचं समोर आलं. पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नितीन वर्मा असं या प्रवाशाचं नाव आहे. जेट एअरवेजच्या मुंबई - दिल्ली विमानाने ते प्रवास करत होते. मात्र मुंबईहून सकाळी 11.30 वाजता उड्डाण करणा-या विमानाला तीन तास उशीर झाल्याने नितीन वर्मा यांना चीड आली होती. विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर समस्या आल्याने विमान जयपूरला वळवण्यात आलं. विमान जयपूरला पोहोचताच सीआयएसएफ आणि पोलिसांनी नितीन वर्मा यांना ताब्यात घेऊन तब्बल तीन तास चौकशी केली.
बोर्डिंगनंतरही तांत्रिक बिघाडामुळे विमान तीन तास विमानतळावरच होते. यामुळे नितीन वर्मा यांनी मोदींना ट्विट केलं. त्यांनी सांगितलं की, "आम्ही गेल्या तीन तासांपासून जेट एअरवेजच्या विमानात आहोत. विमान हायजॅक झालं आहे असं वाटत आहे. आमची मदत करा". नितीन वर्मा यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान कार्यालयात धावपळ सुरु झाली. त्यांना तात्काळ भारतीय विमानतळ प्राधिकरण, हवाई वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिला.
We have been in jet flight for past 3 hrs, look like hijacked, Can I get an update from authority what is the exact reason. pic.twitter.com/bGNrq7GX5e
— Nitin (@nitinvarma5n) April 27, 2017
नितीन वर्मा यांनी भीती निर्माण केली असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद आला आहे. आज त्यांना दंडाधि-यांसमोर हजर केलं जाणार आहे.