काळापैसा : एकेकाला शोधून शोधून पकडणार
By admin | Published: December 22, 2016 11:40 PM2016-12-22T23:40:01+5:302016-12-22T23:40:01+5:30
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी एक मोठा दावा केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळ्याचे पांढरे करण्याचा उद्योग करणाऱ्यांविरोधात प्राप्तिकर विभाग, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याचदरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी एक मोठा दावा केला आहे. सीबीडीटीकडे विस्तारित आयटी विभाग असून, त्याद्वारे काळेधन बाळगणाऱ्या प्रत्येकाला पकडले जाईल, असा इशारा चंद्रा यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीतून दिला आहे.
चंद्रा म्हणाले,"काळ्या संपत्तीविरोधात सरकार याआधी एवढे आक्रमक कधीच नव्हते. कुणी कितीही मोठा असेना का कुणालाही सोडले जाणार नाही. आम्ही याबाबत नोटिसा पाठवत आहोत. आतापर्यंत 3 हजारहून अधिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत." त्याबरोबरच काळा पैसा बाळगणाऱ्यांना ही अंतिम संधी आहे. त्यांना कराच्या चौकटी यावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.