चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:14 PM2024-08-30T22:14:55+5:302024-08-30T22:15:07+5:30

राजदूत राजीव सिक्री यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

Time for discussion is over...! India gave a befitting reply to Pakistan's invitation | चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

राजदूत राजीव सिक्री यांच्या Strategic Conundrums: Reshaping India's Foreign Policy या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी ते बोलत होते. नेबरहुड फर्स्ट पॉलिसीबाबतही पंतप्रधानांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये जागतिक संकटावेळी भारताचे शेजारी देश एका छत्रीखाली आश्रय घेतात. कृतींचे परिणाम होतात, असे जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानवर आपण थोडे समाधानी, धोडे असमाधानी असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया असेल तर आपण प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बांग्लादेशातील सरकारसोबत सहकार्याची वृत्ती नेहमीप्रमाणे कायम राहणार आहे. आम्ही संबंधांना सामायिक हिताच्या दृष्टिकोनातून पाहतो. तिथे झालेले राजकीय बदल आम्ही समजून घेतलेले आहेत. श्रीलंकेतील चीनची उपस्थिती पाहता भारतासाठी द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानशी भारताचे लोक-जनतेचे नाते खूप मजबूत आहे आणि अमेरिकेची उपस्थिती असलेला अफगाणिस्तान आणि त्यानंतरचा अफगाणिस्तान यात फरक आहे. भारताच्या अर्थसंकल्पात भूतानसाठी केलेली तरतूद ही संबंधांना किती प्राधान्य देते हेच दिसून येते, असे शेजारी देशासंबंधी भारताची भूमिका यावर त्यांनी स्पष्ट केले.  
 

Web Title: Time for discussion is over...! India gave a befitting reply to Pakistan's invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.