'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:10 PM2024-08-30T14:10:38+5:302024-08-30T14:14:30+5:30

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाष्य केले.

'Time for talks is over External Affairs Minister Jaishankar criticized on relations with Pakistan | 'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला

'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसापासून संबंध चिघळले आहेत. दहा वर्षांपासून दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा जवळपास थांबली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा पाकिस्तानला भेट दिली असली संबंध अजून चिघळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. "पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले आहे, असं वक्तव्य एस जयशंकर यांनी केले. 

मोठी बातमी! काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, 'पाकिस्तानशी अखंड चर्चेचे युग संपले आहे. जोपर्यंत जम्मू आणि काश्मीरचा संबंध आहे, कलम ३७० रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे आपण पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवू शकतो हा मुद्दा आहे. मला हे सांगायचे आहे की आपण निष्क्रीय नाही आणि घटना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशा घेत असली तरी आपण कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ.

काही दिवसापूर्वी बांगलादेशात सत्ताबदल झाला आहे. दरम्यान, आता बांगलादेशसोबतच्या संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, "आम्हाला तत्कालीन सरकारशी बोलावे लागेल हे स्वाभाविक आहे. राजकीय बदल झाले आहेत आणि ते विस्कळीत होऊ शकतात, हे आम्हाला मान्य करावे लागेल. 

काही दिवसापूर्वी भारताचे मालदिवशीही संबंध बिघडले आहेत.यावर बोलतोना एस जयशंकर म्हणाले, 'मालदीवबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनात चढ-उतार आले आहेत. येथे स्थिरतेचा अभाव आहे. मालदीवशी आमचे जुने संबंध आहेत. हे नाते त्यांच्यासाठी ताकदीचे आहे, असा विश्वास मालदीवमध्ये आहे. यावेळी त्याच्यासाठी हे नाते खूप महत्त्वाचे आहे कारण ते आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत.

Web Title: 'Time for talks is over External Affairs Minister Jaishankar criticized on relations with Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.