राष्ट्रवादाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आलीय - राष्ट्रपती
By admin | Published: March 2, 2017 09:31 PM2017-03-02T21:31:44+5:302017-03-02T21:31:44+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वीपासून विद्यापीठांमध्ये राष्ट्रवादाच्या मुद्यावरून झालेली हाणामारी आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गुरमेहेर कौरला देण्यात आलेल्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - गेल्या काही दिवसांपूर्वीपासून विद्यापीठांमध्ये राष्ट्रवादाच्या मुद्यावरून झालेली हाणामारी आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गुरमेहेर कौरला देण्यात आलेल्या धमक्यांबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच सर्वांनी मिळून राष्ट्रवादाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे, असा सल्लाही राष्ट्रपतींनी दिला आहे.
रामजस महाविद्यालयात अभाविप आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेत एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून मतभेद झाल्यानंतर दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. गुरमेहेर कौर या तरुणीने या हाणामारीसाठी अभाविपला दोषी ठरवत त्यांचा निषेध केला होता. त्यानंतर गुरमेहेरवर एका फोटोवरून टीका होऊ लागली.
दरम्यान, यासाठी जबाबदार असलेल्यांना राष्ट्रपतींनी खडेबोल सुनावले. " ज्या समाजात महिलांचा आदर होत नाही, अशा समाजाला मी सभ्य समजत नाही, असहिष्णू लोकांना या देशात काहीही स्थान नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला महत्त्वपूर्ण अधिकार आहे," असे ते म्हणाले.
विद्यापीठांच्या आवारात हाणामाऱ्या करणाऱ्यांनाही राष्ट्रपतींनी सुनावले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हिंसक कृत्ये करण्यापेक्षा वाद विवाद, चर्चा कराव्यात, कॉलेजच्या आवारातील अशा घटना पाहिल्यावर दु:ख होते. एकंदरीत राष्ट्रवादाची व्याख्या सर्वानी मिळून नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.