मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 06:05 AM2023-07-21T06:05:25+5:302023-07-21T06:06:10+5:30

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

'Time' is driving the death of children and youth; 1 person dies every 24 seconds | मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  भारतात दरवर्षी तब्बल १५ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फिक्की आणि अर्नस्ट अँड यंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू
nजगभरात दर २४ सेकंदाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.
n १.३ अब्जपेक्षा अधिक मृत्यू, ५ कोटी गंभीर जखमींसह रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे प्रमुख कारण आहे. ५ ते २९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे रस्ते अपघात कारण आहे.

जगात प्रत्येक १०वा मृत्यू भारतात
nजगभरात रस्ते अपघातात जे मृत्यू होतात, त्यातील प्रत्येकी दहावा मृत्यू हा भारतातील असतो. 
nदुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने ३२,८७७ चालकांचा तर १३,७१६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हेल्मेट न वापरणे हे ३०% मृत्यूंचे कारण 
२०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू संख्या निम्मी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘ब्रासीलिया घोषणापत्रा’वर भारताने   स्वाक्षरी केली आहे. भारतात रस्ते अपघातात ३० टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात तर ११ टक्के मृत्यू हे सीटबेल्ट न लावण्यामुळे होतात. 

यांच्यावर कारवाई करा
लाल दिवा ओलांडणे, मोबाइल फोन वापरणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे यासारख्या बेपर्वाईला कडक आळा घालण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

४,१२,४३२ - रस्ते अपघात 
हे २०२१ मध्ये झाले.

१,५३,९७२ - जणांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला.

३,८४,४४८ - जण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. 

१,०७,२३६ - जणांचा मृत्यू हा वेगाने गाडी चालविल्यामुळे झाला.

Web Title: 'Time' is driving the death of children and youth; 1 person dies every 24 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.