त्यावेळी खूनी किंवा दहशतवादी असल्यासारखं वाटलं होतं- धोनी
By admin | Published: September 16, 2016 10:36 PM2016-09-16T22:36:12+5:302016-09-16T22:37:43+5:30
टीम इंडियाचा वन-डे आणि टी-20 संघाचा कर्णधार एम एस धोनीने 2007 वर्ल्डकपनंतरच्या कडू आठवणींना उजाळा दिला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.16- टीम इंडियाचा वन-डे आणि टी-20 संघाचा कर्णधार एम एस धोनीने 2007 वर्ल्डकपनंतरच्या कडू आठवणींना उजाळा दिला आहे .2007 च्या वर्ल्डकपमध्ये साखळीतच आव्हान संपल्यानंतर मीडियाने आम्हाला सळो की पळो करून सोडलं होतं .त्यामुळे खूनी किंवा दहशतवादी असल्यासारखं मला वाटलं होतं असं धोनी म्हणाला.
जेव्हा आम्ही दिल्लीत उतरलो त्यावेळी आम्हाला पोलिसांच्या गाडीत नेण्यात आलं होतं. विरेंद्र सेहवाग माझ्या बाजुला बसला होता. मात्र, ज्याप्रकारे मीडियाच्या गाड्या आमचा पाठलाग करत होत्या मनात वेगळीत भीती निर्माण झाली होती. काही वेळानंतर आम्ही एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेथे 15-20 मिनिट थांबून आम्ही तेथून निघालो. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे व आपण कोणीतरी दहशतवादी किंवा खूनी आहोत असं आपल्याला त्यावेळी वाटलं, असं धोनी म्हणाला. धोनीच्या जीवनावर बनवण्यात आलेल्या बायोपीक 'एमएस धोनी द-अनटोल्ड स्टोरी'च्या प्रमोशन कार्यक्रमात धोनी बोलत होता.
2007 च्या वर्लडकपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली पहिल्याच फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं.