संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 01:05 PM2019-02-28T13:05:01+5:302019-02-28T13:13:36+5:30
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली - पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ आहे. असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची भावना सध्या वेगळ्या पातळीवर आहे. देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार आपला पराक्रम दाखवत आहेत. आज संपूर्ण देश आज एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची एकजूट बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका.''
PM Narendra Modi: Hamare sena ke samarthya par hame bharosa hai. Isliye bahut avashyak hai ki kuch bhi aisa na ho jisse unke manobal par aanch aaye ya hamare dushmano ko hamare par ungli uthane ka mauka mil jaaye pic.twitter.com/UOww7Ah9UX
— ANI (@ANI) February 28, 2019
यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली. ''आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाची प्रगती थांबावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.'' असे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi: The enemy tries to destabilize us, carries out terror attacks, they want to stop our growth. We all countrymen are standing like a rock to counter their evil designs pic.twitter.com/YhmuqndZMk
— ANI (@ANI) February 28, 2019
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.