टीना डाबी यांची बहीण IAS रिया डाबी यांचं शुभमंगल, या IPS अधिकाऱ्याला बनवलं जीवनसाथी, महाराष्ट्राशी आहे असंं कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:53 AM2023-06-19T09:53:00+5:302023-06-19T09:56:05+5:30

Riya Dabi's Marriage: टीना डाबी यांची धाकटी बहीण आयएएस अधिकारी रिया डाबी यांनी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या रिया डाबी यांनी आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत लग्न केलं आहे

Tina Dabi's sister IAS Riya Dabi's Marriage, the life partner of this IPS officer, has connections with Maharashtra. | टीना डाबी यांची बहीण IAS रिया डाबी यांचं शुभमंगल, या IPS अधिकाऱ्याला बनवलं जीवनसाथी, महाराष्ट्राशी आहे असंं कनेक्शन 

टीना डाबी यांची बहीण IAS रिया डाबी यांचं शुभमंगल, या IPS अधिकाऱ्याला बनवलं जीवनसाथी, महाराष्ट्राशी आहे असंं कनेक्शन 

googlenewsNext

राजस्थानमधील जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण आयएएस अधिकारी रिया डाबी यांनी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या रिया डाबी यांनी आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत लग्न केलं आहे. सूत्रांच्या मते रिया आणि मनीष यांनी एप्रिल महिन्यामध्येच गुपचूपपणे कोर्टमॅरेज आटोपले होते.

गृह मंत्रालयाच्या एका नोटिफिकेशनमुळे आयएएस रिया डाबी आणि आयपीएस मनीष कुमार यांचा विवाह झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या नोटिफिकेशनमधील माहितीनुसार महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांना आता राजस्थान कॅडरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचं कारण राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी रिया डाबी यांच्याशी झालेलं लग्न हे असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रसारमाध्यमांत येत असलेल्या रिपोर्टनुसार रिया आणि मनीष यांनी आपल्या कामातील व्यस्ततेमुळे या दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं होतं. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोघांचेही कुटुंबीय लग्नाची मोठी मेजवानी देण्याची शक्यता आहे. या समारंभामध्ये विवाहित जोडप्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम दिल्ली किंवा राजस्थानमधील एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो.

२०२१ च्या यूपीएससी परीक्षेच्या निकालांमध्ये रिया डाबी यांनी संपूर्ण देशातून १५ वा क्रमांक मिळवला होता. तर रिया डाबी यांची बहीण टीना डाबी यांनी यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. दोन्ही आयएएस बहिणींना राजस्थान कॅडर मिळालं आहे.  

Web Title: Tina Dabi's sister IAS Riya Dabi's Marriage, the life partner of this IPS officer, has connections with Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.