Tirath Singh Rawat : तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; भाजप नेतृत्त्वाच्या निर्णयानं साऱ्यांनाच धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:48 PM2021-03-10T12:48:51+5:302021-03-10T12:49:19+5:30
Tirath Singh Rawat named new Uttarakhand CM: तीरथ सिंह रावत आज संध्याकाळी ४ वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
देहरादून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपच्या नेतृत्त्वानं तीरथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी धन सिंह रावत, सतपाल महाराज, अजय भट्ट, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांच्या नावांची चर्चा होती. मात्र भाजपनं तीरथ सिंह रावत यांची निवड करत सगळ्यांनाच धक्का दिला. Tirath Singh Rawat named new Uttarakhand CM will take oath at 4 PM today
भाजप आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. रावत आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल बेबी राणी मोर्य यांची भेट घेतली. संध्याकाळी ४ वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रावत यांनी याआधी भाजपचे राष्ट्रीय सचिव, प्रदेश अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. १९८३ ते १९८८ दरम्यान ते संघाचे प्रचारक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तराखंडचे संघटन मंत्री म्हणूनही ते कार्यरत राहिले आहेत.
BJP MP Tirath Singh Rawat to become new chief minister of Uttarakhand: Trivendra Singh Rawat who resigned from the post yesterday
— ANI (@ANI) March 10, 2021
Tirath Singh Rawat will take oath as the chief minister at 4 pm today. pic.twitter.com/ihhLdjkGRG
उत्तराखंडचा मुख्यमंत्री होईन असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांनी निवडीनंतर व्यक्त केली. 'तुमच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. मी अतिशय लहान गावातून आलो आहे. मुख्यमंत्री होण्याचा विचारदेखील कधी केला नव्हता. माझ्याकडे देण्यात आलेली जबाबदारी तुमच्या सहकार्यानं पूर्ण करेन. राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन,' असं तीरथ सिंह रावत म्हणाले.
तीरथ सिंह यांचा जन्म ९ एप्रिल १९६४ झाला. सध्या ते लोकसभेत पौडी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्याआधी २०१२-१७ या कालावधीत ते चौबट्टाखाल मतदारसंघाचे आमदार होते. श्रीनगर गढवालच्या बिर्ला महाविद्यालयातून त्यांनी समाजशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी पत्रकारितेत डिप्लोमा केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघासोबत काम केलं.