प्रादेशिक चित्रपट पाहून थक्कच झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:32 AM2018-04-14T02:32:45+5:302018-04-14T02:32:45+5:30
प्रादेशिक चित्रपट आतापर्यंत फारसे पाहिले नव्हते. मात्र परीक्षक म्हणून जवळपास सर्व भाषांतील चित्रपट पाहता आले. ते पाहून आपण थक्कच झालो.
नवी दिल्ली : प्रादेशिक चित्रपट आतापर्यंत फारसे पाहिले नव्हते. मात्र परीक्षक म्हणून जवळपास सर्व भाषांतील चित्रपट पाहता आले. ते पाहून आपण थक्कच झालो. सर्वच बाबतींत भाषिक चित्रपट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत, हे लक्षात आले, असे प्रतिपादन परीक्षक मंडळाचे प्रमुख शेखर कपूर यांनी केले.
चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शेखर कपूर यांनी प्रादेशिक चित्रपटांचे तोंडभरून कौतुक केले. यंदाच्या पुरस्कारांबाबत सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले. उत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपटाचा पुरस्कार ‘बाहुबली-२’ला मिळण्यात काहीच गैर नाही, अशी प्रतिक्रिया दिग्गजांनी व्यक्त केली. ‘कच्चा लिंबू’ला मिळालेल्या पुरस्कारामुळे आमच्या टीमने जी मेहनत केली, त्याचे चीज झाले, असे प्रसाद ओकने बोलून दाखवले, तर नर्गिस दत्त पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘धप्पा’ चित्रपटाच्या निपुण धर्माधिकारीने आनंद गगनात मावेना, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. लहान मुलांच्या भावविश्वावरील हे दोन्ही चित्रपट आहेत. नागराज मंजुळे यांनीही आनंद व्यक्त केला.
>दुसरा मरणोत्तर पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झालेले विनोद खन्ना यांनी १९७0पासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ते ४९व्या फाळके पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. याआधी पृथ्वीराज कपूर यांनाही हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला होता.
>बॉलिवूडमधील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री : दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : न्यूटन (निर्माता : अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्ये : अब्बास अली मोगल (बाहुबली २)
सर्वोत्कृष्ट स्पेशल
इफेक्ट्स : बाहुबली २
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : गणेश आचार्य (गोरी तू लठ मार आणि टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) : अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ए.आर. रहमान (मॉम)
बंगाली चित्रपट : मयुरक्षी
कन्नड चित्रपट :
हेब्बत रामाक्का
मल्याळम : तोंडीमुतलम दृकसाक्ष्यम
तेलुगू चित्रपट : गाझी
तामिळ : टू लेट
लडाखी : वॉकिंग विद द विंड
ओरिया :
हॅलो आर्सी
गुजराती : जीएचएच
आसामी चित्रपट : इशू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट न्यूटन
बोनी कपूर झाले भावनाविवश : श्रीदेवी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्याबद्दल बोनी कपूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरस्काराची बातमी कळताच ते भावनाविवश झाले. ते म्हणाले, माझी पत्नी म्हणून तिला पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहेच; पण त्या पुरस्कारासाठी तिची निवडच योग्य होती, असे मला वाटते.