"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 06:09 PM2024-09-20T18:09:56+5:302024-09-20T18:10:55+5:30

"आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे."

tirumala laddu row Shankaracharya pragyananand saraswati maharaj attacks on andhra pradesh former cm ys jagan mohan reddy | "सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

तिरुमला तुरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात जगतगुरु शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनीही संताप व्यक्त केला आहे. "हा सनातन धर्माच्या अस्मितासोबत बलात्कार आहे. अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे," असे प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते. 

शंकराचार्य म्हणाले, "प्रसाद केवळ आहार नाही. धार्मिक आस्थेसोबत खेळले गेले आहे. हिंदू धर्मींयांच्या भावनेशी खेळले गेले आहे. हा सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. हा सनातन धर्माच्या अस्मितेसोबत बलात्कार आहे."

जगन मोहन रेड्डींवर हल्ला - 
यावेळी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्मासाठी काम करतात, असा आरोप शंकराचाऱ्यांनी केला आहे. शंकराचार्य म्हणाले, "अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे. मंदिरांना सरकारी यंत्रनेतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. यासाठी भाला उचलावा लागला तरी उचलायला हवा. सनातन धर्माच्या रक्षणासाठी अराजकतावादी होण्याची वेळ आली, तर तसे व्हायरला हवे."

सनातन बोर्ड तयार करायला हवे- 
शंकराचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड तयार करायला हवे आणि सर्व मंदिरे सनातन बोर्ड अन्तर्गत आणायला हवीत. सरकारला मंदिरांपासून दूर ठेवायला हवे. प्रसादात अशा पद्धतीची भेसळ केवळ शडयंत्रच नाही तर एक गुन्हा आहे. कोट्यवधी लोकांच्या आस्थेसोत खेळ आहे. जगन मोहन रेड्डी सह अशा लोकांना जनतेच्या हवाली करायला हवे आणि सनातन धर्म त्यांना शिक्षा देईल. मंदिराचे शुद्धीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.  कर्मचारी, अधिकारी, पुजारी सर्वांना वेगळे करून मंदिराचे शुद्धीकरण करायला हवे. सनातन धर्म रक्षण बोर्डाची तत्काळ स्थापना करायला हवी. वेद प्रणीत धर्म मानणाऱ्यालाच मंदिराचे संचालन करण्याचा अधिकार आहे."
 

Web Title: tirumala laddu row Shankaracharya pragyananand saraswati maharaj attacks on andhra pradesh former cm ys jagan mohan reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.