“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:44 PM2024-09-21T19:44:36+5:302024-09-21T19:47:14+5:30

Amul Company Clear Reaction On Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी अमूल तूप वापरले जात असल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले.

tirumala tirupati laddu controversy amul company make clear that we have never supplied amul ghee to tirumala tirupati devasthanam | “अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

Amul Company Clear Reaction On Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला असून, मंदिरातील लाडू प्रसादाची तपासणी करण्यात येणार आहे. यातच सोशल मीडियावर तिरुपतीला अमूल तूप पाठवण्यात येण्याबाबत चुकीची माहिती शेअर करण्यात आली होती. यासंदर्भात आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. 

तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता

काहीजणांनी सोशल मीडियावर या प्रकरणी सांगितले की, अलीकडच्या काळात लाडवांना कापराचा खूप जास्त गंध येत होता. यापूर्वी महिनाभरापेक्षा जास्त लोटूनही काळ लाडू खराब होत नव्हते. मात्र, आता तीन दिवसांमध्येच लाडू खराब होतात, असे अनेकांनी सांगितले. वर्ष १४८० मध्ये लाडवाचा उल्लेख मंदिरातील नोंदीत आढळतो. त्यावेळी या प्रसादाला 'मनोहरम' असे म्हटले जायचे. ३६ लाख लाडू गेल्या वर्षी १० दिवसांच्या वैकुंठद्वार दर्शनादरम्यान विकण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. 

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला अमूल तूप पुरवठा केला जात असल्याचा उल्लेख काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे. अमूल कंपनीने कधीही तिरुमला तिरुपती देवस्थानमला अमूल तूप पुरवठा केलेला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की, अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते, जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते. अमूल तूप ५० हून अधिक वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात विश्वासार्ह तूप ब्रँड आहे आणि भारतीय घरांचा अविभाज्य भाग आहे. अमूलविरोधातील ही चुकीची माहिती देणारी मोहीम थांबवण्यासाठी ही पोस्ट जारी करण्यात येत आहे, असे अमूल कंपनीने एक्सवर म्हटले आहे. 

तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

दरम्यान, तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जाते.


 

Web Title: tirumala tirupati laddu controversy amul company make clear that we have never supplied amul ghee to tirumala tirupati devasthanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.