दिल्लीकरांना घडणार 'तिरुपती बालाजी'चं दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2015 06:19 PM2015-10-27T18:19:19+5:302015-10-27T18:24:13+5:30
दिल्लीकरांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच खास आंध्रपदेशातील तिरुमल्ला येथून 'तिरुपती बालाजी' अवतणार आहे. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये दहा दिवसांच्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीकरांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच खास आंध्रपदेशातील तिरुमल्ला येथून 'तिरुपती बालाजी' अवतणार आहे. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये दहा दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये 'तिरुपती बालाजी' चे मंदिर हुबेहुब साकारले जाणार आहे.
आत्तापर्यंत आंध्रप्रदेशातच तीन ठिकाणी 'तिरुपती बालाजी' चे हुबेहुब मंदिर साकारण्यात आले होते. आत्ता आंध्राबाहेर दिल्लीत पहिल्यांदाच असे मंदिर बांधण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी दगडाचा वापर करण्यात येणार नसून तिरिमल्ला तिरुपती देवस्थान हे साकारणार आहे.
दिल्लीत मंदिर बांधणीच्या तयारीसाठी लागणारे वेगवेगऴे साहित्य घेवून २५ ट्रक दाखल झाले आहेत. तसेच मंदिर सजवणारेही दिल्लीत दाखल झाले आहेत. आम्हाला असे वाटते की, दिल्लीतील बालाजी भक्तांना हुबेहुब तिरुपतीमधील बालाजी मंदिराचाच अनुभव आला पाहिजे, असे तिरिमल्ला तिरुपती देवस्थान समितीचे सदस्य भानू प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.
तसेच, या दहा दिवसांमध्ये लोकप्रिय असलेला प्रसाद 'लाडू' ही वाटण्यात येणार असून या प्रसादासाठी लागणारे साहित्य तिरुमल्ला येथून पाठविण्यात येणार आहे. फुलांचे साहित्यही तिरुमल्ला येथूनच जाणार आहे.
तिरुपती बालाजीची नित्य पूजाअर्चा करण्यासाठी जवळजवळ १६० पुजारी असणार आहेत. त्याचबरोबर एक दिवसआधी या पुजा-यांसह सुरक्षा रक्षक, कामगार दिल्लीत दाखल होणार आहेत.
येत्या ३० ऑक्टोबरला तिरुपती बालाजीची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येईल, त्यानंतर पुढील दहा दिवस बालाजीची रोज सेवा आणि विशेष पुजा करण्यात येणार असल्याचे भानू प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.