देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात मिळणार आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये प्रसाद! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 09:23 AM2021-08-23T09:23:20+5:302021-08-23T09:32:27+5:30

eco friendly bags : या पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल बॅग डीआरडीओने तयार केल्या आहेत.

tirupati bio degradable laddu bags counter inaugurated at tirumala drdo has prepared these eco friendly bags | देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात मिळणार आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये प्रसाद! 

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात मिळणार आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये प्रसाद! 

googlenewsNext
ठळक मुद्दे मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे.2019 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात भक्तांना मिळणारा प्रसाद आता बायोडिग्रेडेबल बॅगेत मिळणार आहे. मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे (DRDO) अध्यक्ष जी सतीश रेड्डी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी रविवारी या बायोडिग्रेडेबल बॅग काउंटरचे उद्घाटन केले. दरम्यान, या पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल बॅग डीआरडीओने तयार केल्या आहेत. (tirupati bio degradable laddu bags counter inaugurated at tirumala drdo has prepared these eco friendly bags)

हैद्राबादमध्ये DRDO च्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी DRDOचे संशोधन अद्यापही जारी  आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरण पूरक बॅग तयार केली आहे. ही बॅग 90 दिवसांनंतर आपोआप खराब होते. तसेच, पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी काहीही समस्या उद्भवत नाही, असे DRDOच्या अध्यक्षांनी सांगितले.

बायोडिग्रेडेबलची बॅगची सुरूवात
बायोडिग्रेडेबल बॅगची सुरूवात एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. हे प्रोडक्ट मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी म्हटले आहे.

प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी 
2019 पर्यंत तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या संख्येने वापर केला जात होता. 2014-2018 दरम्यान येथील लाडूसाठी भाविकांना 9.63 कोटी पॉलिथीनचे वाटप करण्यात आले होते. तत्कालीन अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

Read in English

Web Title: tirupati bio degradable laddu bags counter inaugurated at tirumala drdo has prepared these eco friendly bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.