“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:45 PM2023-07-18T18:45:17+5:302023-07-18T18:46:20+5:30

आम्हाला इंडियाला वाचवायचे आहे. हिंमत असेल तर आव्हान द्या, असा एल्गार ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या बैठकीनंतर केला.

tmc chief and cm mamata banerjee challenge bjp and nda after opposition meeting | “भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

googlenewsNext

Mamata Banerjee In Bengaluru Meeting: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून २४ विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरू येथे पार पडली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केले. या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि NDA वर सडकून टीका केली. 

INDIA ची बैठक चांगली झाली. आतापासून खरे आव्हान सुरू झाले आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचे ठरले आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकले. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचे जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणे आणि सरकार खरेदी करणे हेच सरकारचे काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरे आव्हान स्वीकारले आहे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. 

भाजपवाले INDIAला चॅलेंज देऊ शकतात का

एनडीए इंडियाला आव्हान देऊ शकते का? भाजप इंडियाला चॅलेंज देऊ शकते का? कोणी इंडियाला चॅलेंज करणार का?, अशी विचारणा करत, आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचेय तर द्या, असे खुले आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले. 

दरम्यान, आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचे आहे, आम्हाला देशाला वाचवायचे आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदे करत आहे. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. 

 

Web Title: tmc chief and cm mamata banerjee challenge bjp and nda after opposition meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.