आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 17:50 IST2021-06-05T17:48:14+5:302021-06-05T17:50:00+5:30
अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी
कोलकाता - टीएमसीच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. आता त्यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बंगाल निवडणुकीपूर्वी अभिषेक बॅनर्जींवरून विरोधी पक्षांनी ममतांवर घराणे शाहीचा आरोप केला होता. मात्र, आता पक्षाच्या विजयानंतर अभिषेक बॅनर्जी यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
टीएमसी (युवा) अध्यक्षपदाचा राजीनामा -
अभिषेक बॅनर्जी सध्या पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानी आज या पदाचा राजीनामा दिला. अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याच बरोबर अभिनेत्री सयोनी घोषकडे टीएमसीच्या युवा संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला
याशिवाय, बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर, आता टीएमसीने शेतकरी नेते राकेश टिकैत यांना बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. पक्षाने 9 जूनला राकेश टिकैत यांना पश्चिम बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. राकेश टिकैत यांनी नंदीग्राम येथेही भाजप विरोधात प्रचार केला होता.
आता मुख्यमंत्री ममतांना टिकैत यांना बंगालमध्ये बोलावले असून, शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. ममता बॅनर्जी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारविरोधात सातत्याने भाष्य करताना दिसतात.