Adani Group: “अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत, हे देशाला जाणून घ्यायचंय”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:00 PM2021-06-27T19:00:52+5:302021-06-27T19:03:49+5:30
Adani Group: आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी टीका केली असून, अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत अजून कळलेले नाही, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च पातळीवर असलेले अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स एकदम कोसळले. यामुळे अदानी समूह तसेच गौतम अदानी यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने अर्थात एनएनडीएलने गोठवल्याची माहिती समोर आली होती. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी टीका केली असून, अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत अजून कळलेले नाही, असे म्हटले आहे. (tmc mahua moitra says that two weeks and we still do not know whose money in adani companies)
“त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका
अदानी समूहातील गुंतवणूकदारांवरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट करत अदानी समूहांतील गुंतणूकदार तसेच मुंबई विमानतळाची मालकी यांवरून काही मुद्दे उपस्थित केले आहे. यासंदर्भात मोईत्रा यांनी ट्विट केले आहे.
2 weeks & we still don’t know whose money in Adani cos.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) June 27, 2021
Security clearance imperative to takeover Mumbai airport. If so, Home Ministry clearly knows who owns shares.
Nation would certainly like to know. Maybe GoI will only answer in Parliament.
अदानींच्या कंपन्यांत कुणी पैसे गुंतवलेत अजून कळेना
दोन आठवडे झाले आहेत आणि अजूनही हे कळलेले नाही की, अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती कोण होती. मुंबई विमानतळाकडून सिक्युरिटी क्लिअरन्सही मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयालाही माहिती आहे की, कोण भागधारक कोण आहे. देशाला जाणून घ्यायचे की, अदानींच्या कंपन्यांमध्ये कोण पैसा गुंतवत आहे. कदाचित भारत सरकार संसदेत याचे स्पष्टीकरण देईल, असे ट्विट मोईत्रा यांनी केले आहे.
Maruti Suzuki डिझेल इंजिनमध्ये पुनरागमन करणार; ‘या’ कार होणार सादर!
दरम्यान, एनएसडीएलच्या वृत्तानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची २५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. यामुळे अदानी समूहाच्या भांडवलाला एका दिवसात तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता. यानंतर, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागातील अग्रणी भागधारकांपैकी तीन परदेशी गुंतवणूकदार फंडांची खाती गोठविली गेलेली नाहीत आणि यासंदर्भातील वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे, असा स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आले होते.