भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:52 PM2021-07-25T18:52:46+5:302021-07-25T18:55:14+5:30

ममता बॅनर्जी यांनी 21 जुलैच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यासंदर्भात सांगितले होते.

TMC Mamata Banerjee to meet senior opposition leaders during delhis visit | भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल निवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 26 ते 30 जुलैदरम्यान दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या पंतप्रधान मोदींनाही भेटणार आहेत. मात्र, त्याच दिवशी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतही बैठकीचे आयोजन केले आहे. याच बरोबोर, या बैठकीसंदर्भात, ममता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अँटी-बीजेपी फ्रंटची तयारी तर करत नाही ना? असे कयास लावायलाही सुरुवात झाली आहे.

टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्यानुसार, दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेऊ शकतात. तसेच यासाठी त्यांनी निमंत्रणही पाठविले आहे. ही बैठक 28 जुलैला दुपारी तीन वाजता होईल असे समजते. यापूर्वी त्याच दिवशी ममता पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी 21 जुलैच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यासंदर्भात सांगितले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आता खुद्द टीएमसीनेच या बैठकीची जबाबदारी घेतली आहे.

पक्षाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसंदर्भात सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. ममतांनी 21 जुलैलाच आपल्या संबोधनात म्हटले होते, की कोरोना नियंत्रणात राहिल्यास त्या थंडीच्या दिवसांतच शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षांसह विरोधी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना ब्रिगेड परेड ग्राउंडवर रॅलीसाठी बोलावतील.

तत्पूर्वी 21 जुलैच्या ममतांच्या व्हर्च्युअल बैठकीत पवार आणि चिदंबरम यांच्या शिवाय एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव, जया बच्चन, डीएमकेचे तिरुची सिवा, टीआरएसचे के. केशव राव, आरजेडीचे मनोज झा, शिव सेनेचे प्रियंका चतुर्वेदी आणि शिरोमणि अकाली दलचे बलविंदर सिंग भुंडर सहभागी झाले होते. हे सर्व पक्ष बंगा भवन येथे होणाऱ्या बैठकीसाठीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 

Web Title: TMC Mamata Banerjee to meet senior opposition leaders during delhis visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.