"नवऱ्याने मारलं तर फोन करु नका"; कोलकाता घटनेचा निषेध नोंदवणाऱ्या महिलांबाबत मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:54 PM2024-08-14T19:54:36+5:302024-08-14T19:57:33+5:30

कोलकात्यातील डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरण तापलेलं असताना टीएमसी आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

TMC MLA has made a controversial statement on Kolkata brutal rape and murder case | "नवऱ्याने मारलं तर फोन करु नका"; कोलकाता घटनेचा निषेध नोंदवणाऱ्या महिलांबाबत मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

"नवऱ्याने मारलं तर फोन करु नका"; कोलकाता घटनेचा निषेध नोंदवणाऱ्या महिलांबाबत मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Kolkata Doctor Case : कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. मात्र हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या क्रूर घटनेचा देशभरातून निषेध नोंदवला जात आहे. विविध ठिकाणी रॅली काढून निषेध नोंदवला जात असताना याबाबत सत्ताधारी तृणमूलच्या मंत्र्याने खळबळजनक असं विधान केलं आहे. मंत्री उदयन गुहा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता रोष व्यक्त केला जातोय.

कोलकात्यातील ३१ वर्षीय डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येविरोधात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘नाईट फ्रीडम रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांबद्दल पश्चिम बंगालचे मंत्री उदयन गुहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. 'नाइट फ्रीडम रॅली'ला जाणाऱ्यांना दिनहाटाचे आमदार गुहा यांनी, "तुमच्या नवऱ्याने तुम्हाला मारहाण केली तर मला फोन करू नका", असं विधान केलं आहे. गुहा यांच्या विधानाचा भाजपकडूनही समाचार घेतला जात आहे.

दुसरीकडे, बंगालमधील अनेक जिल्ह्यांतील महिला बुधवारी मध्यरात्री कोलकाता येथील आरजी कार एमसीएच येथे ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ रॅली काढणार आहेत. स्वातंत्र्याच्या मध्यरात्री, स्त्री मुक्तीसाठी अशी निषेधाची घोषणा आहे. तसेच एम्स संघटनेने केंद्रीय संरक्षण कायदा लागू करण्याच्या त्यांच्या मागणीला दुजोरा देत बुधवारीही देशभरात संप सुरूच ठेवला आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यामुळे रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तिच्यावर ज्याप्रकारे क्रूर आणि अमानुष कृत्ये समोर येत आहेत, त्यामुळे डॉक्टर समुदायामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे, असेही राहुल गांधींनी म्हटलं.
 

Web Title: TMC MLA has made a controversial statement on Kolkata brutal rape and murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.