पत्नीच्या नावाने तिकीट अन् भलत्याच महिलेसोबत प्रवास, TMC आमदाराची TTE ला धमकी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:35 PM2024-09-04T15:35:20+5:302024-09-04T15:35:38+5:30
तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
TMC MLA : तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार ट्रेनमधून प्रवास करतान दिसतोय. यादरम्यान, त्याने तिकीट चेक करणाऱ्या टीटीईला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मालदा-हावडा ट्रेनमध्ये घडली. विशेष म्हणजे, टीएमसी आमदारासोबत एक महिला प्रवास करत होती, टीटीईने तिला तिकीट विचारले असता, तिच्याकडे तिकीट नव्हते. मग आमदाराने आपल्या पत्नीच्या नावाने काढलेले तिकीट दाखवले.
मिळालेल्या माहितीनुसार, नबाग्राममधील टीएमसी आमदार कनई चंद्र मंडल ट्रेनच्या कोच क्रमांक सी 1 च्या सीट क्रमांक 18 वर प्रवास करत होते. यावेळी एक महिलाही त्यांच्यासोबत होती, पण तिच्याकडे तिकीट नव्हते. मग आमदाराने आपल्या पत्नीच्या नावाने बुक केलेले तिकीट दाखवले. यादरम्यान, टीटी आणि आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकरण इतके वाढले की, टीएमसी आमदाराने टीटीईला थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
'Culture' of TMC😳
— Prof Sudhanshu Trivedi (@Sudanshutrivedi) September 3, 2024
जिस विधायक की सैलरी लाखों रुपए में है
क्या वह सिर्फ 120 रुपए का टिकट नहीं ले सकता ??
तृणमूल कांग्रेस के नबाग्राम के एमएलए यानी विधायक कनाई चंद्र मंडल जो इंटरसिटी डाउन एक्सप्रेस में अपने कुछ समर्थकों के साथ बैठे हैं
लेकिन इनके किसी भी समर्थक ने टिकट नहीं… pic.twitter.com/RbHeAOYuSN
TTE ने दाखल केली तक्रार
टीटीईने आमदाराविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने म्हटले की, टीएमसी आमदार कनई चंद्र मंडल यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी टीएमसी आमदाराला काही लोकांसोबत विना तिकीट प्रवास करताना पकडले होते. तेव्हापासून टीएमसी आमदाराकडून या टीटीईला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत टीटीने रेल्वेकडे लेखी तक्रार केली आहे.