Hathras Case : तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांची धक्काबुक्की; मीडियालाही गावात जाण्यास बंदी
By ravalnath.patil | Published: October 2, 2020 02:36 PM2020-10-02T14:36:19+5:302020-10-02T14:37:01+5:30
Hathras Case : हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे.
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना आज पोलिसांनी अडवले. मात्र, यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले.
दरम्यान, हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले.
#WATCH: TMC delegation being roughed up by Uttar Pradesh Police at #Hathras border. The delegation, including Derek O'Brien, was on the way to meet the family of the victim of Hathras incident. pic.twitter.com/94QcSMiB2k
— ANI (@ANI) October 2, 2020
आम्हाला जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली. तरीही, पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतरही पीडित कुटुंबाला भेटायला जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ ठाम राहिले. यावेळी खासदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झालेल्या धक्काबुक्कीत खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा तोल जाऊन खाली कोसळले.
He (Derek O'Brien) was pushed to the ground, maybe he is injured too. He was attacked. How can they do it?: Kakoli Ghosh Dastidar, TMC https://t.co/08J22mAYs4pic.twitter.com/rNaToBfQof
— ANI (@ANI) October 2, 2020
पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप
हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी केले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार ममता ठाकूर यांनी केला आहे. आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होतो, मात्र आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. ज्यावेळी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली आणि प्रतिनिधी मंडळावर लाठीचार्ज केला, असे खासदार ममता ठाकूर यांनी सांगितले.
We're sent by Mamata Banerjee to meet family of the alleged rape victim to offer our condolences. Though we introduced ourselves we weren't allowed to meet them & were pushed by police. If they can't respect a woman lawmaker imagine the condition of commoners: Pratima Mondal, TMC https://t.co/pKzctbWKU7pic.twitter.com/wDvAgcHUDQ
— ANI (@ANI) October 2, 2020
राहुल गांधींना धक्काबुक्की, रस्त्यावर कोसळले
हाथरसच्या पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी हे काल पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले. राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले असल्याचे म्हटले होते. तसेच "पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडले. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?, आमची गाडी थांबवण्यात आली म्हणूनच चालत निघालो होतो" असे देखील काल म्हटले होते. तसेच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.