Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:26 PM2021-05-24T16:26:53+5:302021-05-24T16:28:41+5:30

राज्यपाल आणि ममता सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

tmc mp kalyan banerjee controversial comments against west bengal governor jagdeep dhankhar | Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

Next
ठळक मुद्देखासदार कल्याण बॅनर्जी यांचे वादग्रस्त वक्तव्यराज्यपालांना तुरुंगात पाठवण्याची धमकीराज्यपाल धनखर यांच्याकडून व्हिडिओ ट्विट

कोलकाता:ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. त्यातच राज्यपाल आणि ममता सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची राज्यपालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जीभ घसरली. राज्यपाल संविधानाचे कसाई आहेत. तुमचा कार्यकाळ संपला की, तुम्हाला तुरुंगातच डांबतो, असा धमकी वजा इशारा कल्याण बॅनर्जी यांनी दिला आहे. (tmc mp kalyan banerjee controversial comments against west bengal governor jagdeep dhankhar)

नारदा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या अटकेसाठी राज्यपाल जगदीप धनखर जबाबदार असून, हा राज्यपालांनी रचलेला कट असल्याचा आरोप खासदार बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच कोरोना काळातील व्यवस्थापनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान देशातील जनतेची सुरक्षा करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो

जगदीप धनखर राज्यपालपदी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. तृणमूल काँग्रेस समर्थक राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक हिंसा भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करतील. तसेच भाजपाकडून राजकारण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अभियोगही दाखल केला जाईल. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासह तुरुंगात भाजपाचे अनेक दिग्गज नेते असतील, असे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

व्हिडिओ राज्यपालांकडून ट्विट

कल्याण बॅनर्जी यांनी हुगली येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वादग्रस्त विधान केले. मात्र, त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ राज्यपाल धनखर यांनी ट्वीट केला असून, कल्याण बॅनर्जी यांचे विधान धक्कादायक असल्याचे राज्यपाल धनखर यांनी म्हटले आहे. अलीकडेच नारदा प्रकरणात संशय असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. 
 

Web Title: tmc mp kalyan banerjee controversial comments against west bengal governor jagdeep dhankhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.