'महुआ जी... प्यार से बोलिए'! लोकसभा अध्यक्षांनी टोकल्यानं TMC खासदार भडकल्या, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:06 PM2022-02-04T13:06:03+5:302022-02-04T13:07:20+5:30
यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा आरोप करत त्यांनी पेगॅसस मुद्द्यावरून सरकारला घेरले.
तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोईत्रा गुरुवारी लोकसभेत डॉशिंग अंदाजात दिसून आल्या. महुआ मोईत्रा यांनी संसदेत सावरकरांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत सरकारला घेरले आणि पेगाससचा मुद्दाही उपस्थित केला. लोकसभेत बोलताना महुआ मोइत्रा रागात दिसल्या. यावेळी अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेल्या रमादेवी यांनी त्यांना टोकले आणि महुआजी, प्रेमानं बोल, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षांनी टोकल्याने महुआ मोईत्रा भडकल्या आहेत. यावर ट्विट करताना महुआ मोइत्रा म्हटल्या, माझ्या मौल्यवान वेळेत अडथळा आणणारे चेयर कोण, मी रागाने बोलावे की प्रेमाने? माझा टोन सेट करणे आपले काम नाही. आपण मला केवळ नियमांनुसारच करेक्ट करू शकता. आपण लोकसभेसाठी मोरल सायंस टिचर नाही. एवढेच नाही तर, महुआ यांनी त्यांना दिलेल्या 13 मिनिटांच्या वेळेपूर्वीच बोलणे थांबवल्याचाही आरोप केला आहे.
And who is Chair to interrupt me (taking up MY valuable time) to lecture me on whether I should speak with gussa or pyar?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2022
None of of your business Madam. You can only correct me on rules. You are NOT the moral science teacher for LS.
यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा आरोप करत त्यांनी पेगॅसस मुद्द्यावरून सरकारला घेरले. महुआ म्हणाल्या, पेगासस प्रकरणाची चौकशी करणारी जगभरातील सर्व सरकारे खोटी आहेत. केवळ हेच सरकार खरे आहे, जे आयसोलेशनमध्ये पडून आहे. एवढेच नाही, तर सरकार इतिहास फिल्टर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
टीएमसी खासदार म्हणाल्या, सावरकरांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी लिहिलेले माफीनामे पॉलिटिकल मास्टर स्ट्रोकच्या स्वरुपात दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील स्वतंत्र्य सेनानींच्या उल्लेखावरीही भाष्य केले. नेताजी आणि इतर महापुरुषांची नावे केवळ बोलण्यासाठीच घेतली जातात, असेही त्या म्हणाल्या.