Mahua Moitra : "आता मला कळलं की, रामलीला मैदानातून पतंजली बाबा महिलांच्या कपड्यात का पळाले होते"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:45 PM2022-11-27T12:45:20+5:302022-11-27T12:56:05+5:30
Mahua Moitra And Baba Ramdev : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, 'महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही (पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.' विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले, तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. आता रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी रामदेव बाबांवर (Baba Ramdev) जोरदार हल्लाबोल केला आहे. एका जुन्या घटनेचा संदर्भ देत मोईत्रा यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आता मला कळलं की रामलीला मैदानातून पतंजली बाबा महिलांच्या कपड्यात का पळाले होते. ते म्हणतात त्यांना साडी, सलवार आवडतात आणि…" असं महुआ मोईत्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Now I know why Patanjali baba ran away from Ramlila Maidan in women’s clothes. He says he likes sarees, salwars and ……
— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 26, 2022
Clearly got a strabismus in his brain that makes his views so lop-sided.
"रामदेव बाबांच्या मेंदूत स्ट्रॅबिस्मस झाल्याने त्यांचे विचार एकतर्फी झाले आहेत" असंही महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे, त्या नेहमी आनंदी राहतात, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच, जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या(उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असंही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"