“सरकारची बेकायदा टेहेळणी मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला”; महुआ मोइत्रांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:36 AM2023-11-02T10:36:40+5:302023-11-02T10:37:41+5:30

Mahua Moitra Letter To Lok Sabha Speaker: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे महुआ मोइत्रा यांची चौकशी होणार आहे.

tmc mp mahua moitra wrote letter to lok sabha speaker om birla over apple iphone hacking notification | “सरकारची बेकायदा टेहेळणी मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला”; महुआ मोइत्रांची सडकून टीका

“सरकारची बेकायदा टेहेळणी मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला”; महुआ मोइत्रांची सडकून टीका

Mahua Moitra Letter To Lok Sabha Speaker: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची चौकशी होणार आहे. महुआ मोइत्रा यांच्या संसदीय खात्यावर दुबईतून ४७ वेळा लॉग-इन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी याप्रकरणात मोइत्रांवर आरोप केले होते. यातच आता महुआ मोइत्रा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिले असून, यामध्ये केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 

अ‍ॅपल कंपनीकडून आयफोनवर सरकार-पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे हा इशारा मिळालेल्या इतर खासदारांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी संरक्षण प्रदान करावे, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली. तसेच सरकारकडून केली जाणारी ही बेकायदा टेहेळणी हा राज्यघटनेने हमी दिलेल्या ‘मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला’ असल्याची टीका महुआ मोइत्रा यांनी या पत्रातून केली आहे. 

विरोधी पक्षाच्या खासदारांना तातडीने संरक्षण प्रदान करावे

विरोधी पक्षाच्या नेत्यांना अ‍ॅपल कंपनीकडून ‘सरकार-पुरस्कृत हल्लेखोर तुम्हाला लक्ष्य करत असल्याचा’ संदेश मिळाला आहे. हे हल्लेखोर दूरस्थ पद्धतीने उपकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासह त्यातील डेटा, संभाषणे आणि अगदी कॅमेरा व मायक्रोफोनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोइत्रा यांनी पत्रात म्हटले असून, पेगासस स्पायवेअरचीही आठवण करून देत विरोधी पक्षाच्या खासदारांना तातडीने संरक्षण प्रदान करावे, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात चौकशी करत असलेल्या लोकसभेच्या नैतिकता समितीला कथित गुन्हेगारीच्या आरोपांची तपासणी करण्याचे अधिकार नाहीत, असा दावा महुआ मोइत्रा यांनी केला आहे. नैतिकता समितीला प्रसारमाध्यमांत माझे समन्स जारी करणे योग्य वाटले, त्यामुळे आपण आपले उत्तर आधी प्रसिद्ध केले, असे समर्थन मोइत्रा यांनी केले.


 

Web Title: tmc mp mahua moitra wrote letter to lok sabha speaker om birla over apple iphone hacking notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.