"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 03:44 PM2020-06-09T15:44:37+5:302020-06-09T15:55:41+5:30

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे.

tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona | "फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

Next

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालला व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी शहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सीएए, राजकीय हिंसाचार आणि केंद्राच्या विविध योजना राज्यात लागू न केल्याच्या मुद्द्यावर घेरले. त्यांनी ममतांना सत्तेवरून बाजुला हटवण्याचेही आवाहन केले. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. तसेच पश्चिम बंगालला गरज होती तेव्हा कुठे होतात असा सवाल देखील उपस्थित केला आहे. 

नुसरत जहाँ यांनी काहीही काम न करणारे आणि फक्त बोलणारे चॅम्पियन असं म्हणत अमित शहांवर निशाणा साधला आहे. अच्छे दिनवरूनही टीका केली आहे. 'फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन परतले आहेत. आम्हाला अम्फान वादळ आणि कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राची मदत हवी होती तेव्हा तुम्ही कुठे होतात?' असं ट्विट नुसरत जहाँ मंगळवारी (9 जून) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.

'2014 मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदारीने हाताळलेली कोरोना परिस्थिती, स्थलांतरील मजुरांकडे केलेलं दुर्लक्ष या गोष्टी समोर आल्या आहेत. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत' असं ही आणखी एक ट्विट नुसरत जहाँ यांनी केलं आहे. अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारवर केंद्राच्या योजना लागू न करण्याचा आरोप करत आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देत हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यासाठी इतरही मैदानं आहेत. आपण मैनात तयार करा, दोन-दोन हात होऊन जातील असं म्हटलं आहे. 

अमित शहा यांनी बंगालमध्ये सत्ता बदलेल आणि शपथविधी होताच एकामिनिटाच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना लागू केली जाईल. आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका असं म्हटलं आहे. तसेच जेव्हा सीएए कायदा संमत झाला, तेव्हा ममताजींचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. एवढा राग मी कधीच पाहिला नाही. ममताजी आपण सीएएचा विरोध करत आहात. नामशूद्र आणि मतुआ समाजापासून आपल्याला काय त्रास आहे? सीएएचा विरोध आपल्याला फार महागात पडेल. ही जनता आपल्याला राजकीय शरणार्थी बनवणार आहे, असेही शहा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

स्थलांतरीत मजुरांना 15 दिवसांत घरी पाठवा, त्यांच्यावरील गुन्हे रद्द करा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

Web Title: tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.