पश्चिम बंगालचे नाव बदलणार; ममता बॅनर्जींच्या खासदाराची मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:02 AM2019-12-09T11:02:47+5:302019-12-09T11:03:38+5:30
पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून तणावाचे वातावरण आहे. यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल विधानसभेचे गेट बंद केल्याने उपोषणाला बसल्याचा प्रकार घडला होता. पश्चिम बंगालचे नामांतर बांग्ला करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला जुलै महिन्यात दिल्लीत फेटाळण्यात आले होते. आता पुन्हा राज्य सभेत खासदाराने हा प्रस्ताव मांडला आहे.
पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. यानंतर हा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे पाठविला होता. मात्र, वर्षभराने यांवर भाजपा सरकारने असे राज्याचे नाव बदलता येणार नसल्याचे सांगितले होते.
बॅनर्जी सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात तीन वेगवेगळी नावे देण्यात आली होती. बंगाली मध्ये बांग्ला, इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल अशी तीन नावे मुंजुरीसाठी दिली होती. मात्र, केंद्राने यावर अशी तीन तीन नावे देता येणार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच नामांतरासाठी संविधानामध्ये बदल करावे लागणार असल्याचे सांगितले होते.
यामुळे आज तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी राज्यसभेमध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बंगाल करण्याचा प्रस्ताव शून्य प्रहरामध्ये मांडला आहे. एकच नाव देण्यास सांगितल्याने पश्चिम नाव वगळून केवळ बंगाल ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
TMC MP Santanu Sen has given Zero hour Notice in Rajya Sabha over 'change the name of state of West Bengal to 'Bengal.'
— ANI (@ANI) December 9, 2019