टीएमसी कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यालयाला आग
By admin | Published: January 4, 2017 09:39 PM2017-01-04T21:39:00+5:302017-01-04T21:39:00+5:30
पश्चिम बंगालमधील हुगली येथे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याची घटना बुधवारी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 04 - पश्चिम बंगालमधील हुगली येथे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याची घटना बुधवारी घडली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन दिवसांत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुस-यांदा भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला. बुधवारी हुगली येथील भाजपाच्या कार्यालयाला आग लावली. तर काल (दि.3) तृणमूल कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कोलकात्यातील भाजपाच्या मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी भाजपाचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना कथित चीट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. याच्या निषेधार्ध तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
West Bengal: Alleged TMC workers set BJP office in Hooghly on fire pic.twitter.com/v6QrCl9tEe
— ANI (@ANI_news) 4 January 2017