तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख लोकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:48 AM2019-05-31T04:48:08+5:302019-05-31T04:48:31+5:30

८५ हजार लोकांना तोंडाचा : ७३ हजार लोकांना फुप्फुसाचा कर्करोग

Tobacco consumes one and a half million people every year because of tobacco | तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख लोकांचा बळी

तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख लोकांचा बळी

googlenewsNext

सुमेध वाघमारे 

नागपूर : भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुप्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात. साधारण १ लाख ६० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळून येतात. यातील १ लाख २५ हजार लोकांचा या आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले, भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकट्या नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ४०-४५ टक्के रुग्ण दिसून येत आहेत. महिलांचे प्रमाणही वाढले आहे.

तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारे असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य कारण ठरत आहे. हे व्यंधत्व, पेप्टीक अल्सर यालाही कारणीभूत ठरते. धूम्रपानामुळे रक्तामधील |ऑक्सिजनची मात्रा कमी होते, असे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले.

तंबाखूची अखाद्य पदार्थ म्हणून नोंद व्हावी
भारतात खाद्य पदार्थांमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने अखाद्य पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. दारू, तंबाखूच्या उत्पन्नातून शासनाला मिळणारा एका वर्षाच्या करातून नवीन अद्ययावत कर्करोग रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल. - डॉ. कृष्णा कांबळे

Web Title: Tobacco consumes one and a half million people every year because of tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.